छत्रपती संभाजीनगर
Trending

मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकाराने १ लाख मागितले ! जागेच्या विकासन करारनाम्याचे शासकीय मुल्यांकन निश्चित करण्यासाठी मागितली लाच !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- जागेच्या विकासन करारनाम्याचे शासकीय मुल्यांकन निश्चित करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार यांनी १ लाख लाचेची मागणी केली. याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पवन परिहार (पद – सहाय्यक नगर रचनाकार, (वर्ग 2) नेमणूक- मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शन च्या वतीने काम पाहतात. त्यांचे चिखलठाणा शेत गट क्र.377 मधील 17,100 स्क्वेअर मीटर या जागेच्या विकासन करारनाम्याचे शासकीय मुल्यांकन निश्चित करण्यासाठी यातील आरोपी पवन परिहार, सहाय्यक नगर रचनाकार यांनी पंचासमक्ष 1,50,000/- रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीअंती 1,00,000/- रुपये लाच स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिडको पोलिस स्टेशनमध्ये चालू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी:- नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोअं/अशोक नागरगोजे, कपिल गाडेकर, राजेंद्र जोशी, चालक चंद्रकांत शिंदे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!