शेती खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटने मंत्रालयात क्लार्कची नौकरी लावून देतो म्हणून हर्सूलच्या मुलाला ६ लाखांना गंडवले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – शेती खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटने मंत्रालयात नौकरी लावून देतो म्हणून हर्सूलच्या मुलाला 5,90,000 रुपयांची फसवणूक केली. फोन पे द्वारे ही रक्कम मुलाच्या आई-वडीलांनी त्या एजंटला पाठवली. रक्कम मिळाल्यानंतर त्याने मोबाईल स्वीच ऑफ केल्याने शंका आल्याने फसवणूक झाल्याचे मुलाच्या आई-वडीलांच्या लक्षात आले. हर्सूल पोलिस ठाणे गाठून त्यांनी त्या एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. अनिकेत सुभाष ढापसे (रा. सारासिध्दी, पिसादेवी रोड, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) याला नौकरी लावून देतो म्हणून फसवणूक झाली. अनिकेतच्या आईने दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार त्यांना शेती विकत घ्यायची होती म्हणून शेती खरेदी-विक्री करणारा एजंट संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) या व्यक्तीने ओळखीच्या माध्यमातून सांगितले होते की, मंत्रालयात माझी चांगली ओळख आहे. मंत्रालयात तुमच्या मुलाला क्लार्क म्हणून नोकरी लावून देतो, त्यासाठी १५ लाख रुपये द्यावे लागतील असे त्या व्यक्तीने अनिकेतच्या आईं-वडिलांना सांगितले.
संजय साबळेवर त्यांचा विश्वास बसला. त्यावरून अनिकेतच्या आई-वडीलांनी विचार करून संजय साबळे यांना १५ लाख रुपये अनिकेतच्या नोकरीसाठी देण्याचे ठरले. त्यावरुन दिनांक 03/10/2022 रोजी राहत्या घरी सारारिध्दी येथे ठरल्याप्रमाणे संजय साबळे हा आला. तेव्हा त्यास अनिकेतच्या आई-वडीलांनी फोन पे द्वारे व आरटीजीएस द्वारे दिनांक 03/10/2022 ते 08/10/2022 पर्यंत टप्प्या-टप्याने एकूण रक्कम 5,90,000/- रुपये संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई वाळुज ता. गंगापूर) यांना दिले.
मुलगा अनिकेत सुभाष ढापसे याला नोकरी लावण्यासाठी हे पैसे दिले. संजय साबळे यांना 5,90,000/- रुपये मिळाल्याने त्याने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला म्हणून अनिकेतच्या आई वडीलांना शंका आल्याने त्यांनी त्याचे घर शिवराई वाळुज गाठले. संजय साबळे याच्या आई-वडीलांनी सांगितले की संजय साबळे हा सात महिन्यांपासून आमच्याकडे येत नाही. तुम्ही त्याच्या विरुध्द कोर्टात केस करा व तुमचे पैसे परत घ्या, असे अनिकेतच्या आई-वडीलांना सांगितले.
याप्रकरणी अनिकेत सुभाष ढापसे (रा. सारासिध्दी, पिसादेवी रोड, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ मधुकर निळ हे करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe