गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

परभणीच्या ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणारी टोळी 48 तासांत जेरबंद ! जालन्याच्या मुख्य आरोपीसह गंगापूरचे तिघे जाळ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणारी टोळी 48 तासात जेरबंद करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जालन्याच्या मुख्य आरोपीसह गंगापूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

दिनांक 13/08/2023 रोजी फिर्यादी हनुमान सुखदेव गीते (रा. पिंप्री खुर्द ता. जिंतूर जि. परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे गंगापूर गुरन- 375/2023 कलम-395 भा.द.वी प्रमाणेे गुन्हा दाखल होता. पोलीस ठाणे गंगापूर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा या गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना सतीष वाघ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा श्याम शेषेराव चव्हाण (रा. साळेगांव तांडा ता. जि. जालना ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड जालना) याने त्याच्या साथीदारसह केला आहे. ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्तबातमीवरून जालना येथे जावून सापळा रचून शोध घेतला असता यातील संशयित हा वाहनासह मिळून आला.

त्यास नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव श्याम शेषेराव चव्हाण (वय 37 वर्ष, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडी रोड, जालना) असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार 1) गणेश शांताराम रोकडे रा. जिकठाण ता. गंगापूर, 2) अविनाश रघूनाथ खंडागळे, रा. कानडगांव ता. गंगापूर, 3) विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार रा. सिध्दापूर ता. गंगापूर, 4) बाबासाहेब विष्णू देवकर रा. सिध्दापूर ता. गंगापूर व इतर यांच्यासह केल्याचे कबूल केले.

तसेच त्याच्या साथीदारांचा शोध घेतला असता त्यांच्या राहत्या घराचे परिसरात मिळून आले त्यांचेकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली व त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस करून त्यांनी गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन टाटा झेस्ट, दोन मोटार सायकल, एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राऊंड व तसेच गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 4,76,000/- रूपयांचा मुददेमाल त्यांचे ताब्यातून जप्त करण्यात आला.

आरोपी 1) श्याम शेषेराव चव्हाण, वय 37 वर्ष, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड, जालना 2) गणेश शांताराम रोकडे रा. जिकठाण ता. गंगापूर, 3) अविनाश रघूनाथ खंडागळे, रा. कानडगांव ता. गंगापूर, 4) बाबासाहेब विष्णू देवकर रा. सिध्दापूर ता. गंगापूर यांना पुढील तपासकामी पोस्टे गंगापूर येथे हजर केले आहे.

या गुन्हयांचा तपास पोलीस ठाणे गंगापूर करीत आहे. तपासामध्ये आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, स.पो.नि.सुधीर मोटे, पो.उप.नि.विजय जाधव, पो.उप.नि.भगतसिंग दुलत, पोह/नामदेव शिरसाठ, पोह/रवी लोखंडे, वाल्मीक निकम, पोना/अशोक वाघ, पोअ/आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!