छत्रपती संभाजीनगर

शिक्षणाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाने उडाली गटशिक्षणाधिकाऱ्यांची झोप!; नक्की काय आहे हा आदेश वाचा…

संभाजीनगर, दि. १४ ः जिल्हा परिषद शाळांत चालणाऱ्या विविध उपक्रमांचा व्हिडिओ काढून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्‍यामुळे गटशिक्षणाधिकारी धास्तावले आहेत.

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे, की गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत जाऊन गुणवत्तेची चाचपणी करताना विद्यार्थ्यांसोबत साधलेला संवाद, शाळा परिसराची स्वच्‍छता, स्वच्‍छतागृहांची अवस्था, ग्रंथालय, गणित पेटी, भाषा पेटी, इंग्रजी पेटी व क्रीडा साहित्यांचा वापर होतो की नाही, पोषण आहार स्वयंपाकगृहाची स्वच्छता, धान्य साठवण, हँडवॉश स्टेशन आदींचे व्हिडिओ चित्रिकरण करायचे आहे. हे व्हिडिओ १५ डिसेंबरपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यास बजावले आहे.

Back to top button
error: Content is protected !!