विद्यापीठ निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचेच वर्चस्व, 44 पैकी 35 जागांवर विजय !
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, विद्यापरिषद गटाच्या निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने 44 पैकी 35 जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक, विद्यापरिषद गटाची निवडणूकीत 10 डिसेंबर रोजी झाली होती. सदरील निवडणूकीचा आज निकाल जाहीर करण्यात आला. व्यवस्थापन प्रतिनिधी गटाच्या 6 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे एस.टी.प्रवर्गातील उमेदवार नितीन जाधव बिनविरोध निवडून आले तर खुल्या प्रवर्गातून डॉ.मेहेर पाथ्रीकर, गोविंद देशमुख, अश्लेष मोरे विजयी झाले.
त्यांना अनुक्रमे 33, 32 व 28 मते मिळाली. प्राचार्य गटात 9 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे एस.टी.प्रवर्गातील उमेदवार डॉ.शिवदास शिरसाठ बिनविरोध निवडून आले तर एस.सी.प्रवर्गातून डॉ.गौतम पाटील 46 मते, व्हीजेएनटी प्रवर्गातून डॉ.गोवर्धन सानप 52 मते, खुल्या प्रवर्गातून डॉ.बाबासाहेब गोरे 15 मते, डॉ.भारत खंदारे 14 मते, डॉ.विश्वास कंधारे 13 मते, डॉ.संजय कोरेकर 13 मते, डॉ.दादा शेंगुळे 9 मते घेऊन विजयी झाले. विशेष म्हणजे प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाच पैकी पाच जागांवर उत्कर्ष पॅनलने बाजी मारली.
विद्यापीठ अध्यापक गटात उत्कर्ष पॅनलचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार डॉ.भास्कर साठे 60 मते, एस.सी.प्रवर्गातील डॉ.चंद्रकांत कोकाटे 65 मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाले. अधिसभा अध्यापक गटाच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत उत्कर्ष पॅनलने दहा पैकी सात जागांवर विजय मिळवला. यात एस.सी.प्रवर्गातून डॉ.संजय कांबळे, एस.टी. प्रवर्गातून डॉ.सतीश गावित, ओबीसी प्रगर्वातून डॉ.रविकिरण सावंत, महिला प्रवर्गातून डॉ.कल्पना घारगे, खुल्या प्रगर्वातून डॉ.अंकुश कदम, डॉ.मुंजा धोंडगे, डॉ.विक्रम खिल्लारे यांनी विजय मिळवला.
विद्यापरिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत उत्कर्ष पॅनलने सहा पैकी पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून खुल्या प्रवर्गातून डॉ.राजेश लहाने 1565 मते, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून एस.सी.प्रवर्गातून डॉ.वैभव मुरूमकर 1258 मते, महिला प्रवर्गातून डॉ.रेखा गुळवे 1280 मते, मानव्यविद्या शाखेतून खुल्या प्रवर्गातून डॉ.राजेश करपे 1484, आंतरविद्या शाखेतून खुल्या प्रवर्गातून डॉ.प्रभाकर कराड 1210 मते घेऊन विजयी झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले.
पहिल्या टप्यात अधिसभा (सिनेट) पदवीधर गटात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. एंकदरीत विद्यापीठाच्या अधिसभेच्या एकूण 38 पैकी 30 तर विद्यापरिषदेच्या 6 पैकी 5 जागांवर विजय मिळवत आ.सतीश चव्हाण यांच्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले.
फोटो- व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून गोविंद देशमुख तर प्राचार्य गटातून डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ.गौतम पाटील विजयी झाल्याबद्दल विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ.शिवाजी मदन यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला…
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe