छत्रपती संभाजीनगर
Trending

ऐश करण्यासाठी मोटारसायकली चोरी करणारे तीन युवक वडगांव कोल्हाटीत लावलेल्या सापळ्यात अडकले ! ग्राहक न मिळाल्याने आठ दुचाकी पोलिसांच्या गळाला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७-  मौज मजा करण्यासाठी मोटार सायकल चोरी करणारे तीन युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. वडगांव कोल्हाटी येथे पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात हे तिघे अडकले. त्यांच्या ताब्यातून आठ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. एकूण 6,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे.

1) संतोष आबासाहेब कदम (वय 30 वर्ष, रा. भोसले यांचे घरात किरायाने, वडगांव कोल्हाटी, वडगांव हॉस्पिटल जवळ, छत्रपती संभाजीनगर), 2) राहुल कैलास देशमुख (वय 26 वर्षे, रा. फड यांचे घरात किरायाने, सप्तश्रृंगी माता मंदिराचे जवळ, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) व 3) दिलीप सुधाकर लंबे (वय 24 वर्षे, रा. जयभवाणी चौकाचे जवळ किरायाने, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील विविध ठिकाणी घडलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचा तपास करत असतांना CCTV कॅमे-यांची पाहणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, घाटी दवाखाना व एमजीएम हॉस्पिटल येथील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील चोरटे हे एकच आहेत. त्यावरून शहरातील विविध ठिकाणच्या CCTV कॅमे-याची पाहणी केली असता सदरचे मोटार सायकल चोर हे वडगांव कोल्हाटी भागातील आहेत.

त्यावरून दिनांक 27/05/2023 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने वडगांव कोल्हाटी येथील जोसेफ शाळेजवळील मोकळ्या मैदानामधून चोरीच्या मोटार सायकल विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असताना सापळा लावून 1) संतोष आबासाहेब कदम (वय 30 वर्ष, रा. भोसले यांचे घरात किरायाने, वडगांव कोल्हाटी, वडगांव हॉस्पिटल जवळ, छत्रपती संभाजीनगर), 2) राहुल कैलास देशमुख (वय 26 वर्षे, रा. फड यांचे घरात किरायाने, सप्तश्रृंगी माता मंदिराचे जवळ, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) व 3) दिलीप सुधाकर लंबे (वय 24 वर्षे, रा. जयभवाणी चौकाचे जवळ किरायाने, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे विचारपुस केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी मौजमजा करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विविध भागांतून मोटारसायकल चोरी केल्या असून त्या विक्री करण्यासाठी ग्राहकाचा शोध घेतला. परंतु ग्राहक न मिळाल्याने त्या लपवून ठेवल्या असल्या बाबत कबुली दिली. त्यांच्या ताब्यामधून एकूण 6,00,000/- रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाणे सिडको ०१, बेगमपुरा ०२, एम आय डी सी वाळुज ०३ या प्रमाणे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरट्यांना पोलीस ठाणे बेगमपुरा येथे मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता हजर करण्यात आले आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय.) अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अविनाश आघाव, पोलीस उप निरीक्षक प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, शुभव विर, नरेश भोंडे, ज्ञानेश्वर पवार, अवलिंग होनराव सर्व नेमणुक गुन्हे शाखा शहर यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!