महाराष्ट्र
Trending

मुंबई नांदेड तपोवन, काचीगुडा रोटेगाव, नगरसोल नरसापूर एक्स्प्रेस उशिरा धावणार ! उद्या 5 तासांचा लाईन ब्लाॅक, या रेल्वे उशीरा धावणार !!

नांदेड, दि. ७ – सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 08 एप्रिल रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.

दिनांक 08 एप्रिल उशिरा धावणाऱ्या गाड्या
1. गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 17232 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस 90 मिनिटे उशिरा धावेल.

09 एप्रिल ला उशिरा सुटणारी गाडी :
01. दिनांक 09 एप्रिल ला धर्माबाद येथून सकाळी 04 वाजता सुटणारी 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.

Back to top button
error: Content is protected !!