छत्रपती संभाजीनगर
Trending

TCS कंपनीत नौकरीसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या युवकाला बारापुल्ला गेट जवळ लुटले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- पुण्याच्या हिंजवडीतील TCS कंपनीत नौकरीसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या युवकाला बारापुल्ला गेटजवळ लुटल्याची घटना मध्यरात्री घडली. लक्ष्मी कॉलनी येथून बसस्थानकाकडे पायी जात असताना दोन चोरट्यांनी हल्ला चढवून युवकाची शोल्डर बॅग पळवली.

राहुल गंगाधर म्हस्के (रा, लक्ष्मी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) या युवकाला चोरट्यांनी मध्यरात्री लुटले. राहुल म्हस्के हे TCS कंपनी हिंजवडी (पुणे) येथे खा. नोकरी करतात. म्हस्के यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून, दि 23/10/2023 रोजी 03.00 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून पुणे येथे जाण्यासाठी लक्ष्मी कॉलनी येथून बसस्थानकाकडे पायी जात होते.

बारापुल्ला गेट जवळ आले असता तेथे समोर रोडच्या बाजुला एक अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याने राहुल म्हस्के यांना शुक शुक असा आवाज दिला. त्यामुळे राहुल म्हस्के जागीच थांबले. तो व्यक्ती राहुल म्हस्केजवळ आला व त्यांने शर्टची कॉलर पकडून अंधारात नदीच्या पात्राकडे ओढून नेले.

त्यावेळी राहुल म्हस्के त्यांना म्हणाला की ” भैय्या छोडो मै लक्ष्मी कॉलनी मे रहनेवाला हूँ.. प्लीज मुझे मत मारो” असे म्हणत असताना दुसरा अनोळखी व्यक्ती तेथे आला व त्याने शिवीगाळ करून दगडाने राहुल म्हस्केच्या डोक्यात मारून जखमी केले व शोल्डर बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले. याप्रकरणी राहुल गंगाधर म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!