छत्रपती संभाजीनगर
Trending

फुलंब्री तालुक्यातील जातेगावच्या सेवानिवृत्त कोतवालांना आंबेडकर चौकात दुचाकीस्वाराने उडवले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – फुलंब्री तालुक्यातील जातेगावच्या सेवानिवृत्त कोतवालांना आंबेडकर चौकात दुचाकीस्वाराने उडवले. जखमीला सुरुवातीला मिनी घाटी व नंतर मोठ्या घाटीत दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला.

जगनाथ शाहुबा शेजवळ (वय 64 वर्षे रा. जातेगाव ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी सेवानिवृत्त कोतवालाचे नाव आहे. शेजवळ यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 20/10/2023 पासून छत्रपती संभाजीनगर येथील मुलीकडे शेजवळ आले होते. दि. 22/10/2023 रोजी सकाळी जेवण करून आंबेडकरनगर चौकात दाढी करण्यासाठी दुपारी 01.00 ते 01.30 वाजेच्या सुमारास चौकातून रोड ओलाडून पलीकडे जात असताना पल्सर कंपनीच्या अज्ञात मोटार सायकलस्वाराने त्यांना जोराची धडक दिली.

या धडकेत जगनाथ शेजवळ खाली पडले. त्यांना प्रथम उपचार कामी चिकलठाणा येथील मिनिघाटीत दाखल केले. तेथे उपचार करून हाडाच्या पुढील उपचारासाठी मोठ्या घाटीत नेले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन व एक्सरे काढल्यावर उजवा पाय मनगटात फॅक्चर असल्याने डॉक्टरांनी प्लॅस्टर करून रात्री सुट्टी दिली.

याप्रकरणी अपघातातील जखमी जगनाथ शाहुबा शेजवळ यांनी सिडको पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!