छत्रपती संभाजीनगर
Trending

११ शिक्षक मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल झाल्याने शिक्षकांमधून तीव्र संताप ! सरकारच्या धोरणावर कडाडून टीका, संघटना आंदोलनाच्या तयारीत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- निवडणूक विभागाच्या कामास गैरहजेरी लावल्याने ११ शिक्षक, मुख्याद्यापकांवर गुन्हा दाखल होताच शिक्षकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणासारखे पवित्र काम करणार्या गुरुजणांवरच अशा पद्धतीने दबावतंत्राचा वापर करून गुन्हे दाखल करण्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. शिक्षकांवर ज्ञानार्जना व्यतीरिक्त अवांतर कामे लादण्यास भाग पाडणार्या प्रशासनावर शिक्षण क्षेत्रामधून कडाडून टीका होत असून संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

निवडणुक विभागाने मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक असल्याचा दावा छत्रपती संभाजीनगर तहसील प्रशासनाने केला आहे. छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयात सुरु असलेल्या निवडणुक कामकाजावर हजर न होता टाळाटाळ करणार्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विद्यापीठाचे कुलसचिव भगवान साखळे यांच्यासह ११ शिक्षक व मुख्याध्यापकांचा समावेश आहे. वारंवार नोटीसा व भ्रमणध्वनी करूनही या ११ जणांनी प्रतिसाद न दिल्याने तहसील प्रशासनाने या सर्वांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

एस जी मिसाळ (गजानन बहुद्देशीय शाळा, गारखेडा), श्वेता रमाकांत साबळे (गजानन बहुद्देशीय शाळा, गारखेडा), श्रीमती देशमुख (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), एस ए शेख (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), एस डी जाधव (माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, गारखेडा), डॉ. भगवान के साखळे (कुलसचीव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), आर टी साबळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), श्रीमती ताजवे (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव), कि दौ बावस्कर (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव), कैलास टेकाळे (मनपा प्रथमिक शाळा, नारेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर तहसील प्रशासनाने या शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जात आहे. अवांतर कामामुळे शिक्षकांमधून आधीच रोष व्यक्त होत असताना निवडणूकाची कामे लावल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक हा पिढी घडवण्याचे काम करत आहे. शिक्षकांना ज्ञानार्जना व्यतीरिक्त कामे लादू नये अशी मागणी संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. प्रसंगी मोठे आंदोलनही केले आहे. मात्र, अद्यापही सराकार अन् प्रशासनाचे डोळे उगडलेले नाही. उलट शिक्षकांवर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करून दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या दबावतंत्राला शिक्षक बळी पडणार नाही, यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत संघटना आहे.

Back to top button
error: Content is protected !!