महाराष्ट्र
Trending

पंधरा वर्षांपूर्वी तो साधू बनला, जालन्यात वाहनाच्या बेदरकार धडकेने जीव गेला ! नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार तर पत्नी म्हणाली काही एक नातेसंबंध नाही, पोलिसांनी व स्वच्छता कर्मचाऱ्यांनीच केले अंत्यसंस्कार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – पंधरा वर्षांपूर्वी तो साधू बनला. भीक्षा मागून उतरनिर्वाह करू लागला. दरम्यान जालन्यात अपघातात मृत्यू झाला. त्याच्या खिशातील डायरीतून त्याची ओळख पटली. नातेवाईकांना फोन केला तर ते म्हणाले आम्ही त्याचा अंत्यसंस्कार करणार नाही. तर काही दिवसांनी पत्नी जालन्यात दाखल झाली. त्यांचा आमच्याशी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काही एक संपर्क नाही. तसेच साधू बनल्यानंतर कुटुंबाशी काही एक संपर्क राहत नाही व काही एक नातेसंबंध राहत नाही. त्यांच्या मरणाबाबत माझी काही एक तक्रार नाही असा जबाब देवून मृताच्या पत्नीने जबाबदारी झटकली. मात्र, जालन्याचे पोलिस आणि नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांनी त्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करून माणूसकीचे दर्शन घडवले. एकीकडे पोलिस प्रशासन व नगर परिषदेने माणूसकीचे दर्शन घडवले असतानाच रक्ताच्या नात्याने कशी जबाबदारी झटकली हे वास्तव चटका लावून जाणारे आहे.

बालाप्रसाद खिलाडीलाल ठाकूर (वय 65 वर्षे रा. बिलगना ता. शिवरा जि.जबलपुर रा. मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. कुंडलिका नंदीवरील मस्तगड ते गरीबशहा बाजारकडे जाणारे पुलाजवळ रोडवर जुना जालना येथे अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रथम माहिती अहवाल पोलिसांनीच दाखल केला आहे. साधी तक्रार दाखल करण्याची तसदीही मृताच्या पत्नीने घेतली नाही. यामुळे पोलिसांनाच पुढे येवून तक्रार दाखल करावी लागली. अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे, बेदरकार चालवल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे.

पोहेकॉ कैलास रंगनाथराव जायभाये (पोलीस ठाणे कदीम जालना) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 23/05/2023 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास पोकों अन्सारी यांना डायल 112 वर कॉल आला की, मस्तगड परिसरातील कुंडलीका नदीवरील पुलावर एक अनोळखी व्यक्ती रोडवर मृत अवस्थेत पडलेला आहे. असा कॉल आल्याने पोका अन्सारी यांनी स्थानिक मदत घेवून सदर व्यक्तीस सामान्य रुग्णालय जालना येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्या व्यक्तीस मृत घोषीत केले. यावरून (वय 65 वर्ष अंदाजे) पोलीस ठाणे कदिम जालना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत व्यक्तीची पाहणी केली असता एका छोट्या डायरीमध्ये सदर मृताचे नाव बालाप्रसाद खिलाडीलाल ठाकूर (वय 65 वर्षे रा. बिलगना ता. शिवरा जि.जबलपुर रा. मध्य प्रदेश) असे असल्याचे समजले. सदर डायरीमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकवर संपर्क केला व सदर मृत बालाप्रसाद खिलाडीलाल ठाकूर (वय 65 वर्ष रा. बिलगना ता.शिवरा जि.जबलपुर रा.मध्य प्रदेश) यांच्या नातेवाईकांनी सदर मृत हा आमचा नातेवाईक असून तो बरेच वर्षांपासून आमच्या संपर्कात नाही. असे सांगून त्यांचा अंत्यविधी आम्ही करित नाही, असे सांगितल्याने पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा केला.

याशिवाय प्रश्नोत्तर फॉर्म भरून वैद्यकीय अधिकारी यांना मृताच्या प्रेतावर पि.एम. होवून मृत्यूचे कारण समजून घेण्यासाठी पि.एम.करून अभिप्राय मिळणे बाबत पत्र दिले. त्यानंतर नगर परिषद जालना येथील स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने सदर मृतदेहावर रामतिर्थ स्मशान भूमी जालना येथे अंत्यविधी केला. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा दोन पंचासमक्ष केला. सदर घटनास्थळ हे कुंडलिका नंदीवरील मस्तगड ते गरीबशहा बाजारकडे जाणारे पुलाजवळ रोडवर जुना जालना येथे रोडवर आहे.

दिनांक 25/06/2023 रोजी यातील मृताची पत्नी रामकुवारी बाई बालाप्रसाद ठाकुर (वय 47 वर्षे रा. बिलगमा ता. शिवरा जि.जबलपुर राज्य मध्यप्रदेश) ही पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने जबाब दिला की, सदर मृत हा पती असून ते मागील दहा ते पंधरा वर्षांपासून दीक्षा घेवून साधू बनले होते. भीक्षा मागून उदरनिर्वाह करित होते. त्यांचा आमच्याशी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून काही एक संपर्क नाही. तसेच साधू बनल्या नंतर कुटुंबाशी काही एक संपर्क राहत नाही व काही एक नातेसंबंध राहत नाही. त्यांच्या मरणाबाबत माझी काही एक तक्रार नाही असा जबाब मृताच्या पत्नीने दिला आहे.

दरम्यान, सदर मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला. DEATH DUE TO HEAD INJURY & INJURY TO LOWER ABDOMEN & SHOCK & INJURIES TO USCERAL ORAGANS & MULTYPLE FRACTURE OF BODY PARTS LIKE THIGHS LEG & ARMS असा अभिप्राय सदर अहवालात डॉक्टरांनी दिला. या पि.एम. रिपोर्टवरून पोलिसांनी कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!