छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महानगरपालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त ! आपली नौकरी अशा पाल्यांना द्या जे वृद्धापकाळात सांभाळ करतील, सफाई मजुरांना आयुक्तांचा सल्ला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या विविध विभागांत काम करणारे वर्ग ०३ व वर्ग ०४ चे एकूण ३० कर्मचारी आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

स्मार्ट सिटी कार्यालय येथे प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत या ३० कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, आस्थपना अधिकारी अभय प्रामाणिक, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रशासक म्हणाले की, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनचे पैसे जपून वापरावे आणि वर्ग चारच्या सफाई मजुरांनी आपली नोकरी आपल्या पाल्यांमध्ये अशा मुला किंवा मुलीला द्यावी जी त्यांची काळजी घेणार आहे किंवा घेतील. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोगी आणि सुखात जीवनाबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रशासक यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती पत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

आज निवृत्त झालेल्या ३० कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग तीन चे ०५ कर्मचारी व वर्ग चार चे २५ कर्मचारी यांचा समावेश आहे. यात वर्ग तीन चे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी मध्ये अनुक्रमे कनिष्ठ अभियंता -०१, अनुरेखक -०१,वाहन चालक -०१,मुख्याध्यापक -०१, वीजतंत्री (पा.पू.वि) -०१ असे एकूण पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

वर्ग चारमध्ये सफाई मजूर २०, हेल्पर ०१, मलेरिया मजूर -०२, दाया -०१, सुरक्षा रक्षक -०१ असे एकूण २५ स्त्री व पुरुष कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!