छत्रपती संभाजीनगर
Trending

औरंगाबाद शहरात विटांची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्यांना प्रवेश बंदी ! पहाटे ४ वाजेपासून केवळ साडेतीन तास मुभा !!

वाढती लोकसंख्या, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेचा निर्णय

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – शहरातील अरुंद रस्ते व त्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विटांची वाहतूक करणार्या जड व मध्यम वाहनांना औरंगाबाद शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वीट वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औरंगाबाद शहरात दररोज पहाटे ०४.०० ते सकाळी ०७.३० वाजेपर्यंतच प्रवेश करण्यास परवानगी असेल, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्र. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी संभाजीनगर लाईव्हला दिली.

औरंगाबाद शहरातील सार्वजनीक वाहतूकीचे विनियम व नियमन करण्यासाठी औरंगाबाद शहरात जड व मध्यम माल वाहतुक करणारे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. औरंगाबाद शहरात लोकसंख्या व वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच अरुंद रस्ते, व अपघाताचे प्रमाणातही वाढ होत आहे.

शहरात व शहरालगत वाढती वसाहत व त्यांची बांधकामे या करीता लागणारे वीट वाहतूक करणारे वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे होणारे छोटे-मोठे अपघात बघता, नागरिकांच्या सुरक्षितेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून औरंगाबाद शहरात वीट वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहतूकीचे विनियम व नियमन करणे आवश्यक आहे.

वीट वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औरंगाबाद शहरात दररोज पहाटे ०४.०० ते सकाळी ०७.३० वाजेपर्यंत प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे. इतर वेळेत सदर वाहनांनी औरंगाबाद शहरात व रहदारी रोडवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सदर वाहनांनी निर्गमित केलेल्या वेळेतच वीट मालाची वाहतूक करावी. इतर वेळेस प्रवेश करु नये. अधिसुचनाचा भंग करणारी व्यक्ती मो.वा.का, म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

Back to top button
error: Content is protected !!