महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर शासन निर्णय !

मुंबई, दि. ६ – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जुन्या शासन निर्णयातील तरतूदीत सुधारणा करण्यात आली आहे.

असा आहे शासन निर्णय:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाडयांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्तीसंदर्भात संदर्भाधीन शासन निर्णयान्वये अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी केलेल्या शिफारशीस अनुसरून मिनी अंगणवाडी सेविकेच्या नियुक्ती संदर्भातील संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२३ मधील मुद्दा क्रमांक १ (ब) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२३ मधील तरतूद- मिनी अंगणवाडी केंद्राचे, अंगणवाडी केंद्रांत रुपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस, जर ती किमान १२ वी पास असेल तर तिला “अंगणवाडी सेविका” म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी.

सुधारित तरतूद- मिनी अंगणवाडी केंद्राचे, अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस, जर ती किमान १० वी उत्तीर्ण असेल तर तिला “अंगणवाडी सेविका” म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी. तथापि, नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करावयाचे असल्यास अथवा एखाद्या मिनी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेचे पद सेवानिवृत्तीमुळे, राजीनाम्यामुळे अथवा अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास त्या ठिकाणी नवनियुक्त मिनी अंगणवाडी सेविकेकरिता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता १२ वी उत्तीर्ण राहील.

Back to top button
error: Content is protected !!