छत्रपती संभाजीनगर
Trending

पाचोऱ्याच्या हॉटेल कारागिरावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन परिसरात चोरट्यांचा हल्ला ! पोलिसांनी एकाला पकडले, दुसरा पसार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- रेल्वेस्टेशन येथे सिटी बस स्टॉपवर बाकड्यावर बसलेल्या पाचोऱ्यातील हॉटेल कारागिरावर दोघांनी हल्ला चढवून लुटले. याचवेळी सिटीबसच्या चालक व कंडक्टरने समयसुचकता दाखवून सोडवासोडव तर केलीच शिवाय पोलिसांनाही बोलावले. त्यानंतर पोलिसांनी एका चोरट्याला पकडले. एक चोर मात्र पसार झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास संभाजीनगर रेल्वेस्टेशन परिसरात घडली.

अनिल मेश्राम मेटकर (वय-32 वर्षे, धंदा-हॉटेल कारागीर, रा- बिलजी ता. पाचोरा जि. जळगाव) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 05/05/2023 रोजी सकाळी 06.00 वाजता राहते घर बिलजी ता. पाचोरा येथून कामासाठी मनमाड येथे जाण्यासाठी अनिल मेश्राम मेटकर हा बसने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन येथे व तेथून रेल्वेने मनमाडला काम पाहण्यासाठी गेला.

तेथे काम पाहीले व तेथून अनिल मेश्राम मेटकर हा रात्री 08.30 वाजेच्या देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने छत्रपती संभाजीनगर येथे दि. 06/05/2023 रोजी रात्री 00.13 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वेस्टेशनवर उतरला. तेथून हर्सूल येथे जाण्यासाठी रेल्वेस्टेशन येथे सिटी बस स्टॉपवर बाकड्यावर अनिल मेश्राम मेटकर हा बसलेला असतांना तेथे दोन अनोळखी आले व एका अनोळखीने हाताचपटाने मारहाण करण्यास सुरुवात केली व दुस-याने पॅन्टच्या खिशात हात घालून बळजबरीने अनिल मेश्राम मेटकर याच्या खिशातून 950/- रुपये रोख रक्कम व ब्राऊन रंगाची सँग (बॅग) ज्यामध्ये कपडे व दोन चादरी असे हिसकावून चोरटे पळून गेले.

मारहाण करताना तेथे उभे असेलेल म.न.पा. चे सिटी बसचे चालक व वाहक दोघांनी मारहाण करताना सोडवासोडव केली. त्यानंतर सिटी बस चालकाने डायल 112 ला फोन करून बोलावून घेतले व तेथे पोलीस आले. त्यानतंर अनिल मेश्राम मेटकर व पोलीसांनी मारहाण करणा-या दोघांचा शोध घेत असतांना सदरचे दोन्ही लोक रेल्वेस्टेशनच्या आऊट गेट जवळ दिसून आले. त्यांचा पाठलाग केला असता पैकी एक जण मिळून आला व एक जण तेथून पळुन गेला. पकडलेल्या युवकाचे नाव गाव विचारता त्याने नासेर जमिर सय्यद (वय 27 वर्षे, रा. रहेमिया कॉलनी) असे सांगितले. त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

याप्रकरणी अनिल मेश्राम मेटकर याने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!