महाराष्ट्रसिल्लोड
Trending

अंगणवाडी सेविकांच्या हल्लाबोल मोर्चाने एकात्मिक बाल विकास कार्यालय दणाणले ! 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, कर्मचार्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्याच्या घोषणा देत संपूर्ण कार्यालय परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे त्या तुलनेत मानधन वाढत नसल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. दरम्यान, राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेत कोणताच ठोस निर्णय न झाल्याने येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली असून तशा आशयाचे निवेदनही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने सिल्लोडमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला. सिल्लोड (जि. औरंगाबाद) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून अंगणवाडी सेविकांनी मोर्चाला प्रारंभ केला. अगदी शांततेच्या मार्गाने आपल्या प्रलंबित मागण्याचे फलक घेऊन हा मोर्चा सिल्लोडच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कार्यालयावर येऊन पोहोचला.

या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष प्रा.कॉ राम बाहेती, जिल्हा संघटक कॉ. अनिल जावळे, कॉ. माया भिवसाने, कॉ संगीता अंभोरे आदीनी केले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. वाढत्या महागाई घर चालवण अवघड झाले आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना राज्य सराकारी कर्मचार्यांचा दर्जा देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

सेवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा. ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांना एक लाख रुपये तातडीने देण्यात यावा, ही मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, आयटकच्या शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी यांना 20 फेब्रुवारी 2023 पासून हाक दिलेल्या बेमुदत संपाचे निवेदन देण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नावर प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत सविस्तर चर्चाही यावेळी करण्यात आली. अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे मानधन वेळेवर करणे, आहाराची बिले खात्यावर जमा करावे यासह अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आयटक तथा कृती समितीला चर्चेसाठी बोलावले असल्याचेही मोर्चा प्रमुख जिल्हा अध्यक्ष प्रा.कॉ राम बाहेती यांनी याप्रसंगी सांगितले. या चर्चेत कोणता निर्णय होईल यावर कळवले जाईल, असेही ते याप्रसंगी म्हणाले. संघटनेकडून अधिकृत महिली मिळेपर्यंत  माघार घेऊ नये. राज्य सरकार समवेत यापूर्वी चर्चा झाली आहे. त्यात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परंतु सरकारला संपाची नोटीस मिळाल्यानंतर एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल या चर्चा करणार असल्याचेही बाहेती यांनी याप्रसंगी सांगितले.

अंगणवाडीसंदर्भातील खालील बातम्याही वाचा-

आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !

अंगणवाड्यांचे समायोजन होणार: ग्रामीण प्रकल्पामधील जी अंगणवाडी केंद्र नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांचे नागरी प्रकल्पात समायोजन करण्याचा निर्णय !

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाने मुंबईचे आझाद मैदाण दणाणले ! मानधन व पेन्शनसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक !!

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा दिलासादायक निर्णय घेऊ, लवकरच बैठक घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश !!

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता ! मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विम्यावर सकारात्मक निर्णय घेणार !!

अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मजबूत संपर्क जाळ्याद्वारे अधिकाधिक स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचता येणार !

अंगणवाडी पर्यवेक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांसह अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय !!

अंगणवाडी, ग्राम पंचायतीमध्ये ‘सुकन्या समृद्धी योजनेत’ खाते उघडण्यासाठी प्रबोधन !

Back to top button
error: Content is protected !!