महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी : विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही भाऊबीज भेट !

मदत लवकरात लवकर सर्व जिल्ह्यांत वितरित करण्याचे आदेश- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.10 : नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी “भाऊबीज भेट” रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट” रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मार्च 2023 पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आत्तापर्यंत भाऊबीज दिली होती. आजच्या शासन निर्णयामुळे दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर,2023 या कालावधीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली असून यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले 37 कोटी 33 लाख रुपये आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट म्हणून दिलेले 3 कोटी असे एकूण 40 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना २ हजारांची भाऊबीज भेट देणार ! वाचा सविस्तर शासन निर्णय !!

मुंबई – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपये रक्कम मंजूर करणे बाबत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागच्या वतीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट प्रत्येकी रुपये २,०००/ प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

असा आहे शासन निर्णय :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचा-यांना सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये २,०००/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका याना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी पोषण आहार, (०८) (०६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (भाऊबीज भेट) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (२२३६१९५४) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधुन रुपये ३७.३३०२ कोटी (अक्षरी रुपये सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार फक्त) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट अदा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावी. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!