मुंबई, दि. १२ ः भ्रष्टाचार आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र सीबीआयने जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं न्यायालयाला सांगितल्याने जामिनावर १० दिवसांची स्थगिती मिळाली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर शिक्कामोर्तब केले तरच देशमुखांची तुरुंगातून सुटका होऊ शकणार आहे. तोपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल.
अनिल देशमुख यांच्यावर सध्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला. देशमुखांवरील आरोप आरोप खोटे असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांनी केला.
प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना आरोप केले असून, परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुखांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असे देशमुखांचे वकील ॲड. विक्रम चौधरी न्यायालयात म्हणाले. त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र लगेचच सीबीआयने जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.
सध्या देशमुख आर्थर रोड तुरुंगात नाहीत तर रुग्णालयात आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जामिनावर प्रतिक्रिया देताना आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही बातमी मिळाली हे दुग्ध-शर्करा योगाप्रमाणे असल्याचं म्हटलं आहे.
आम्ही मागील अनेक महिन्यांपासून याची वाट पाहत होतं. खरं तर ईडी प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणातही जामीन मिळायला हवा होता, असं भुजबळ म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe