छत्रपती संभाजीनगर
Trending

प्रा.डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना पत्नी शोक, प्रा. सुनंदाताई यांचे निधन, आज अंत्यविधी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – प्रा. सुनंदाताई दत्ताभाऊ पाथ्रीकर (७२) यांचे आज, सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, निर्मल क्रिडा व समाज प्रबोधन ट्स्टचे अध्यक्ष प्रा.डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या त्या पत्नी होत.

अंत्यविधी आज दुपारी ४:३० वाजता वैकुंठ स्मशान भूमी जकात नाका, एन-६ सिडको येथे होणार आहे.  प्रा.सौ.सुनंदा पाथ्रीकर या देवगिरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सध्या त्या निर्मल क्रिडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या ज्येष्ठ संचालिका म्हणून कार्यरत होत्या.

त्यांच्या पश्चात पती प्रा.डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर, मुलगा डाॅ. देवेश,दोन मुली,डाॅ.स्वाती,डाॅ.सोनाली व नातवंडे असा फार मोठा परिवार आहे.

Back to top button
error: Content is protected !!