राजकारण

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर, जाणून घ्या केव्हा आणि कुठे होणार निवडणुका ?

नवी दिल्ली, दि. ९ : संपूर्ण देशाचे लक्ष लागूल असलेल्या पाच राज्यामधील विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी 12 वाजता देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या.

निवडणूक आयोगाने देशातील 5 राज्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या सर्व राज्यांच्या सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत संपत आहे. सध्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे, तेलंगणात बीआरएसचे सरकार आहे आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली.

पाचही राज्यांचा दौरा आणि सुरक्षेचा आढावा- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या टीमने पाचही राज्यांचा दौरा केला आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान सुरक्षेबाबत संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

या कालावधीत करता येणार मतदान कार्डात दुरुस्ती
यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, या 5 राज्यांतील 16.1 कोटी मतदारांपैकी 60.02 लाख प्रथमच मतदार आहेत. यासोबतच 16.1 कोटी मतदारांपैकी 8.2 कोटी पुरुष आणि 7.8 कोटी महिला मतदार आहेत. यासोबतच 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदार कार्डमध्ये बदल करता येणार आहे.

या तारखांना या पाच राज्यांमध्ये मतदान – निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर नक्षलग्रस्त राज्य छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, तर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याशिवाय 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात आणि 23 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना मतदान होणार आहे, मात्र निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला एकत्र येतील.

Back to top button
error: Content is protected !!