राजकारण
Trending

जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडावर थुंका, चपलांचा हार घाला ! राजद आमदाराच्या वादग्रस्त विधानाने खळबळ !!

नवी दिल्ली, दि. ९- सध्या देशभरात वादग्रस्त विधान करण्याची स्पर्धा चालू असल्याचे दिसते. राजकीय पुढारी काय बोलेल याचा नेम नाही. बिहारचे माजी कृषी मंत्री आणि RJD आमदार सुधाकर सिंह यांनी अशाच प्रकारचे वादग्रस्त विधान करून राजकीय व प्रसासकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे. सुधाकर सिंह यांनी शेतकरी सभेला संबोधित करताना हे वादग्रस्त विधान केले. बिहारच्या अधिकाऱ्यांना लाठ्या-काठ्यांशिवायही कसे टाळ्यावर आणायचे, यावर त्यांनी भाष्य केले.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे राजद आमदार सुधाकर सिंह यांनी राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या विधानानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. “जर जिल्हाधिकारी तुमच्याकडे आला तर त्याच्या तोंडावर थुंका, कोणतेही कलम लागणार नाही. तो आला तर त्याला फुलांऐवजी चपलांचा हार घाला,” असं आमदार म्हणाले आहेत. कैमूर जिल्ह्यात आयोजित किसान महापंचायतीला संबोधित करताना सुधाकर सिंह यांनी ही वादग्रस्त टिप्पणी केली.

जे खुर्च्यांवर बसतात आणि सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत ते नक्षलवादी- राजद आमदाराने आपल्या भाषणात लोकांना विचारले, नक्षलवादी कोण आहेत? तेव्हा सुधाकर सिंह स्वतः उत्तर देत म्हणाले, “जे खुर्च्यांवर बसतात आणि सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत ते नक्षलवादी आहेत. जंगलात राहणारे बंडखोर आणि नक्षलवादी नाहीत, तर खुर्च्यांवर बसलेले लोक नक्षलवादी आहेत.”

सरकारमध्ये बसलेले लोक आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष कराहेत – सुधाकर सिंह कैमूरचे शेतकरी गेल्या एक वर्षापासून भारत माला प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी योग्य मोबदला देण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारमध्ये बसलेले लोक आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. ते म्हणाले, “खूप दिवस झाले तरी सरकार आमचे ऐकत नव्हते, त्यामुळेच आम्ही कृषिमंत्री पदाचा राजीनामा दिला. आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवत आहोत, हिंमत असेल तर सरकार बरखास्त करावे.

Back to top button
error: Content is protected !!