छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

संतप्त जमावाने जेसीबी जाळला, मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाला पिटाळले ! पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताचापटाने मारहाण; मुकुंदवाडीतील २७ जणांवर गुन्हा दाखल !!

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरातील धक्कादाय घटना

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने जेसीबी जाळला. मनपा अतिक्रमण पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताचापटाने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुकुंदवाडीतील २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास गट क्रं ४५ रेल्वे गेट क्रमांक ५६ जिजाईनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे घडली. 1) सनी उर्फ संजय गायकवाड, (2) विशाल म्हस्के, (3) अशोक साबळे, (4) पप्पु जायभाय, (5) दीपक रामटेके, (6) ज्ञानेश्वर तिकांडे, (7) अशोक येडे व त्यांचे सोबतचे इतर पंधरा ते वीस अनोळखी (सर्वे राहणार, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपीतांची नावे आहेत.

याप्रकरणी प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी श्रीधर पुंजाराम टारपे यांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 26.10.2023 रोजी 11.00 वाजाता मौजे मुकुंदवाडी गट क्र.45, रेल्वे गेट क्रमांक 56 जिजाऊनगर छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या जमीनीवर वाडेकर यांनी न्यायालयाच्या मनाई हुकूमाच्या आदेशाचे उल्लंघन करून पत्र्याचे शेड बांधले आहे, या आशयाचा तक्रारी अर्ज होता.

यावरून सदरचे अतिक्रमण काढून घेण्याचे तोंडी आदेशाने कार्यवाही करणेकामी मनपा अतिक्रमण पथकातील कर्मचारी व JCB क्रमांक MH20AS8182 सदर ठिकाणी पोहोचले. तेथे अतिक्रमणाची कार्यवाही करत असतांना आरोपीतांनी जमाव जमवून मनपाचे पथक करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून आरडाओरड, शिवीगाळ करून प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी श्रीधर पुंजाराम टारपे व गायकवाड तसेच इतर अतिक्रमण पथकातील कर्मचारी यांना हाता चापटाने मारहाण केली. शासकीय मालमत्ता असलेली JCB क्रमांक MH20AS8182 ची काच तोडून आग लावून जाळले. यात शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले.

याप्रकरणी प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी श्रीधर पुंजाराम टारपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं 461/2023 कलम 353,332, 435,143, 147,149, 323,504, भादवी सह कलम 3,4 सा.सं.नुकसान अधी. 1984 नुसार मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी समाधान वाठोरे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!