महाराष्ट्र
Trending

वेग इतका होता की मागच्या बाजूने कठाड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली ! बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितली ५ बळी घेतलेल्या भीषण अपघाताची आपबीती !!

आष्टी तालुक्यातील गांधणवाडी फाट्याजवळ भीषण अपघात

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- वेग इतका होता की मागच्या बाजूने कठाड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली. बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितली ५ बळी घेतलेल्या भीषण अपघाताची आपबीती. अपघातग्रस्त खासगी बसचा चालक सुरुवातीपासूनच गाडी जोरात चालवत होता त्यामुळे मोठा अपघात झाला. हा अपघात गांधणवाडी फाटा जवळ (ता. आष्टी, जि. बीड) घडला. याप्रकरणी ट्रॅव्हल चालक मच्छिंद्र रामचंद्र जायभाय (रा तांदळवाडी ता जि बीड) याच्यावर आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

रज्जाक गुरखान पठाण (वय 37 वर्षे, व्यवसाय कंटेनर चालक रा. रामनगर, करमाळा रोड, आरुळे वस्ती जवळ जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर) असे ट्रॅव्हलमधील जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल जामखेड येथील अपतकालीन कक्षात उपचार सुरु आहेत. पठाण यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते छत्रपती संभाजीनगर येथील ओमकार ट्रान्सपोर्ट येथे कंटेनर चालक म्हणुन नौकरी करतात.

दिनांक 26.10.2023 रोजी रज्जाक पठाण हे छत्रपती संभाजीनगरहून मुळ गावी जामखेड येथे जात होते. छत्रपती संभाजीनगरवरून अहमदनगर असा प्रवास करून चांदनी चौक अहमदनगर येथे रज्जाक पठाण उतरले. पाहाटे 04.30 वाजे दरम्यान रज्जाक पठाण हे चांदनी चौक अहमदनगर वरून सागर ट्रॅव्हल्सची गाडी (क्रमांक. NL 01- B-2499) मध्ये जामखेडला जाण्याकरिता बसले. सदरील ट्रॅव्हल्सचा चालक हा सुरवातीपासून अति वेगात ट्रॅव्हल्स चालवत होता. दरम्यान, रज्जाक पठाण यांचे गाव जवळ आल्याने ते ट्रॉव्हलच्या कॅबिनमध्ये आले असता अंदाजे 06.00 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल गांदणवाडी फाटा जवळ आली.

सदर ट्रॅव्हल अतिशय जोरात असतांना चालकाला कंट्रोल करता आले नाही व त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅव्हल बस उलटली. सदर ट्रॅव्हलचा वेग इतका होता की गाडीच्या मागच्या बाजून कठाड्याला धडकून ती उलटली. व पुढे फरपटत गेली. गाडी फरपटत गेल्यामुळे मोठा आपघात झाला. सदरील आपघातामध्ये गाडीमध्ये आसणारे २० ते २५ जखमी झाले व त्याच बरोबर पाच जण मृत झाले.

1. धोंडीबा यशवंत शिंदे वय 36 वर्षे रा जांदनांदुर बीड 2. देवीदास दत्तु पेचे रा सौताडा ता पाटोदा जि बीड 3. मोहमद आसिफ खान 4. रवी यादव गोडसे रा पुसद जि यवतमाळ 5. अशोक महादेव बोंडवे रा पिठी नायगाव ता पाटोदा जि बीड अशी मृतांची नावे आहेत. ट्रॅव्हल चालकाचे नाव मच्छिंद्र रामचंद्र जायभाय रा तांदळवाडी ता जि बीड असे आहे. सदर आपघातामध्ये रज्जाक पठाण यांच्या डोक्याला पायाला पाठीला, गुडघ्याला जबर मार लागला. या अपघातात खासगी बसचा चेंदामेदा झाला.

Back to top button
error: Content is protected !!