छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

भूमी अभिलेख कार्यालयाने १० लाख पाणीपट्टी भरली ! ATC टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर मोबाईल टॉवरकडूनही १८ लाख वसूल !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके तर्फे शहरातील निवासी व व्यवसायिक मालमत्ता धारक यांच्याकडील थकीत मालमता कर व पाणी पट्टी बाबत सर्व ०९ झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली व मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे. दमडी महल येथील भूमी अभिलेख कार्यालय यांचे कडील थकीत पाणीपट्टी कर रक्कम रु १०,१८,७७३३११/- वसूल करण्यात आले आहेत.

प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांचे अध्यक्षतेखाली उप-आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनानुसार, सहा.आयुक्त, झोन क्र.4-राहुल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश हिवरकर,भरत देवकर यांच्या पथकाने ATC टेलिकॉम (मोबाईल टॉवर) यांचे कडून रु.०८,००,४४८/-, सहायक आयुक्त झोन क्र.-5 सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगधर विधाते ,मुकुल बांगर व जयंत कुलकर्णी यांच्या पथकाने ATC टेलिकॉम ( मोबाईल टॉवर) यांच्या कडून रु.०९,५४,३३४/- व सहायक आयुक्त झोन क्र.7-प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार विसपुते व पथक कर्मचारी यांच्या द्वारे ATC टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर (मोबाईल टॉवर) यांचे कडून थकीत मालमत्ता कर रक्कम रु९२,५८४ रु धनादेश स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.

भूमी अभिलेख कार्यालय यांचे कडून पाणीपट्टी कर रु.१०,१८,७७३/- वसूल

उप आयुक्त तथा कर निर्धारक संकलक अपर्णा थेटे यांच्या व झोन क्र.०३ मा सहायक आयुक्त अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक आबेद अली, पथक प्रमुख युवराज सोनवणे यांच्या पथका द्वारे दमडी महल येथील भूमी अभिलेख कार्यालय यांचे कडील थकीत पाणीपट्टी कर रक्कम रु १०,१८,७७३३११/- वसूल करण्यात आले आहेत.

तसेच सहायक आयुक्त राहुल सूर्यवंशी झोन न ०८ यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्र १०६ कांचनवाडी – नक्षत्रवाडी येथील ग्रँड कल्याण यांचे कडील थकीत मालमत्ता कर रक्कम *रु १९,८०,०७३ वसूल करण्यात आले. सदर कारवाई अधीक्षक भारत बिऱ्हारे,कृष्णा दौंड,पथक प्रमुख सागर सोनवणे ,विनोद पवार,शुभम खडके आदी कर्मचारी यांच्या पथकाने केली, अशी माहिती कर निर्धारक व संकलक विभागाच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!