छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक ! बिल्डरांच्या मनमानीला महानगरपालिकेने लगाम कसला !

आता अग्निशमन सेवा फी आणि लेबर सेस बीपीएमएस ऑनलाइन प्रणाली मार्फत

संभाजीनगर लाईव्ह, दि. 31- बांधकाम परवानगीसाठी अर्ज करताना आता अग्निशमन सेवा फी आणि लेबर सेस बीपीएमएस ऑनलाईन प्रणाली मार्फत सहज भरता येणार आहे. याशिवाय बिल्डरांच्या मनमानीला महानगरपालिकेने लगाम कसला आहे.

याआधी दोन्ही फी वेगळी भरावी लागत होती. आता एका छता खाली बांधकाम परवानगीशी निगडित सर्व सुविधा बीपीएमएस ऑनलाईन प्रणाली मार्फत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती नगररचना विभागामार्फत देण्यात आली आहे.

याशिवाय दिनांक 01 सप्टेंबर पासून नगररचनाशी निगडित सर्व प्रकरणे ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि सदरील सुविधांचा लाभ घ्यावा, अशी सूचना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!