छत्रपती संभाजीनगर
Trending

अंगणवाडी मदतनीसांची जिल्हा परिषदेअंतर्गत भरती प्रक्रिया ! अंगणवाडी मदतनिसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.31- जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात निवड झालेल्या 106 अंगणवाडी मदतनिसांना जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, महिला बालविकास अधिकारी शिवाजी वने तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!