गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

समृद्धी महामार्गावरील L&T कंपनीच्या कॅम्पमधून साहित्य चोरणारे गंगापूर तालुक्यातील जांभाळाचे चार चोरटे जेरबंद !

दौलताबाद पोलिसांकडून चोरटे अटक, चोरी गेलेला एकूण १,५०,५०० रुपयांचा माल जप्त

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१-  बहुचर्चीत समृद्धी महामार्गावरील L&T कंपनीच्या कॅम्पमधून सामान चोरणारे चार चोरटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील जांभाळा येथील हे चोरटे असून त्यांच्याकडून चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चोरट्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला एकूण १,५०,५०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

दौलताबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्हि.एम. सलगरकर यांनी दिलेली माहिती अशी की, समृध्दी महामार्ग बनवणारी L& T कंपनीकडे महामार्गाचे पुढील चार वर्षांपर्यंत मेटेन्सनचे काम आहे. कंपनीचे बेस कॅम्प जांभाळा शिवारात असून तेथील गोडावून मधून व परिसरामधून 1,50,500/- रुपये किमतीचे लोखंडी साहित्य हे दि.१६/०८/२०२३ रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. यासंदर्भात L&T कंपनीचे इंजिनिअर उदयकुमार माडसामी यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यावरून दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास अधीकारी पोउपनि अयुब पठाण व त्यांचे पथकाने अत्यंत बारकाईने करुन तात्काळ आरोपीचा शोध घेतला. सदरचा माल हा आरोपी (१) शेख शोएब सलाऊद्दीन शेख (वय २४ वर्षे) २) शेख मतीन आरेफ शेख (वय ३० वर्षे), ३) शेख मिनाज शेख महेमुद (वय २५ वर्षे) ४) शेख अफसर शेख निसार (वय ३१ वर्षे सर्व रा. जांभाळा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनग) यांनी चोरल्याची माहिती मिळाली. या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला १,५०,५००/- रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर ठिकाणावरून आणखी काही माल चोरीस गेल्याची शक्यता असल्याने पुढील तपास सुरु आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग अशोक थोरात, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आयुब पठाण, सफौ, शेख सलीम, पोना संजय दांडगे, पोअं. बंडु गोरे, पो. अं. ज्ञानेश्वर कोळी यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि अयुब पठाण करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!