छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश, परभणी जिल्ह्याच्या हद्दीतही आदेश जारी ! पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई !!

ग्रामीण भागात (37)(1)(3) कलम लागू

Story Highlights
  • 15 मे पर्यंत राहणार आदेश लागू

संभाजीनगर लाईव्ह, दि. 11 : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत 15 मे पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केले आहे.

परभणी जिल्ह्यातही शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

परभणी, दि. 11 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी आंचल गोयल यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 15 मे, 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील.

या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील.

तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!