महाविद्यालयांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशास मनाई ! जास्त जागांना प्रवेश दिल्यास मान्यता मिळणार नाही !!
महाविद्यालयांची विद्यार्थी संख्येसह अंतिम यादी प्रसिध्द
संभाजीनगर लाईव्ह, दि.११ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ४५१ महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशासाठी मान्य जागांसह (इनटेक कॅपॅसिटी) अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मान्यतेशिवाय जास्त जागांना प्रवेश दिल्यास मान्यता मिळणार नाही असे, आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत.
शैक्षणिक विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यायांसाठीची सर्व माहिती अद्यवायत करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक विभागाने संलग्नित महाविद्यालयासंदर्भात विविध निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयांचे सर्व शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करून घेण्यात येत आहे. अकॅडमिक ऑडीट करुन घेण्यात येत आहे. तसेच अनेक महाविद्यालयांची अनियमितता आढळल्यास आर्थिक दंडही सुनावण्यात आला आहे.
या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शैक्षणिक विभागाच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, विद्यापीठाशी शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांची ती महाविद्यालये चालवित असलेल्या अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता यासह अंतिम यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शैक्षणिक विभागाच्यावतीने सदरील यादीचे अवलोकन करुन त्यामध्ये काही त्रुटी असल्यास तसे शैक्षणिक विभागास १५ मे पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात यावे. त्यानंतर आवेदनांचा विचार केला जाणार नाही. तसेच सर्व ४५८ महाविद्यालयाच्या नावासमोर दर्शविलेले अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता या नुसारच प्रवेश झालेले असावेत. त्यामध्ये काही बदल झालेले असल्यास ते स्वीकारण्यात येणार नाहीत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी दिली.
महिना अखेरपर्यंत पुढील वर्षांची यादी : कुलगुरु
सन २०२३-२४ शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वीच मे अखेपर्यंत संलग्नित महाविद्यालये मान्यता प्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता याची यादी प्रसिध्द केली जाईल. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधितम महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी म्हटले आहे. तसेच पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम पुर्वता व परीक्षेचे वेळापत्रत तंतोतंत पालन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe