महाराष्ट्र
Trending

गायछाप दिली नाही म्हणून मारहाण, हातपाय तोडण्याची धमकी, दौलताबाद पोलिसांत गुन्हा !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – मी जेवण करत आहे तुम्ही पाच मिनटे थांबा माझे जेवण झाल्यावर मी तुम्हाला गायछाप देतो. वेळेवर गायछाप दिली नाही याचा राग मनात धरून तिघांनी मारहाण केल्याची घटना धरमपूर येथे घडली. हातपाय तोडण्याची धमकीही दिल्याच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश गंगाधर लोखंडे (वय 32 वर्षे धंदा मजुरी रा. धरमपूर ता जि औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरू गणेश विठ्ठल मोरे (वय 32 वर्षे), योगेश विठ्ठल मोरे (वय 30) बबन खडसुने (वय 33 वर्षे सर्व रा. धरमपुर ता. जि औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश गंगाधर लोखंडे (वय 32 वर्षे धंदा मजुरी रा. धरमपूर ता जि औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, मजुरी काम व किराणा दुकान चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

योगेश लोखंडे यांनी दि. 02/02/2023 रोजी म्हशीना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास चारा पाणी करुन घरीच होते. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमरास योगेश लोखंडे हे घरी जेवत असताना गावातील गणेश विठ्ठल मोरे (वय 32 वर्षे), योगेश विठ्ठल मोरे (वय 30) बबन खडसुने (वय 33 वर्षे सर्व रा. धरमपुर ता. जि औरंगाबाद) हे आले. त्यांनी योगेश लोखंडे यांना गायछाप मागितली. मी जेवन करत आहे तुम्ही पाच मिनट थांब माझे जेवन झाल्यावर मी तुम्हाला गायछाप देतो असे योगेश लोखंडे त्यांना म्हणाले.

त्यानंतर योगेश लोखंडे हे घरातून बाहेर आले असता त्या सर्वांनी सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून योगेश लोखंडे यांना हाताचापटाने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी योगेश लोखंडे त्यांना म्हणाले की तुम्ही मला का मारता काय झाले असे बोलत असताना ते म्हणाले की सकाळी आपले भांडण झाले होते ते तु विसरला का ? असे म्हणून मारहाण करु लागले.

त्यावेळी योगेश मोरे याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने योगेश लोखंडे यांच्या हातावर, पायावर व पाठीवर मारहाण करुन जखमी केले. त्यांची पत्नी ही भांडण सोडविण्यास आली असता तिला पण हाताचापटाने मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यावेळी शेजार्यांनी हे भांडण सोडवले. त्यानंतर गणेश व योगेश हे योगेश लोखंडे यांना म्हणाले की आज तर तू वाचला पण तू जर आम्हाला नंतर भेटला तर तुझे हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार योगेश लोखंडे यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरू तिघांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!