
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – वैजापूर तालुक्यात चोरट्यांनी डोके वर काढले असून बेलगाव शिवारात पत्र्याचे घर फोडले. चोरट्यांनी रोलेक्स घड्याळासह २ लाखांचा ऐवच चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एकनाथ मनाजीं पगारे यांच्या घरी चोरट्यांनी डाव साधला. पगारे यांचे वैजापूर तालुक्यातील मौजे बेलगावमध्ये पत्र्याचे घर आहे. त्यामध्ये दोन रुम व एक किचन आहे. चार पाच दिवसांपूर्वी पगारे यांच्या पत्नीची बहिण व तिचे पती हे मुंबईहून कार्यक्रमानिमीत्त आले होते. दिनांक 02/02/2023 रोजी घरातील सर्वजण नेहमीप्रमाणे जेवण करुण रात्री 11.30 वाजता झोपी गेले.
पगारे यांचा मोठा मुलगा सुरज हा शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला होता. त्यामुळे घराचा दरवाजा मुलाने कडी न लावता फक्त लोटून घेतला होता. दरम्यान, घरातील सर्व जण झोपी गेले. दिनांक 03/02/2023 रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास पगारे यांच्या पत्नीने पाणी पिण्यासाठी उठल्या. त्यावेळी त्यांनी बघितले असता घरातील वस्तू व इतर साहित्य हे सुरक्षित होते.
सुरज हा दिनांक 03/02/2023 रोजी सकाळी 05.15 वाजेच्या सुमारास शेतातून पाणी भरुण घरी परतला तेव्हा त्याने घरातील सर्वाना उठवले. आपल्या घरात चोरी झाली असल्याचे सूरजने लक्षात येताच सांगितले. सर्वानी झोपेतून उठून पाहिले असता घराच्या आतमधील मागच्या रुममधील लोखंडी कपाट उघडलेले दिसले. त्यातील ड्रावर व पर्स तेथे दिसून आली नाही. घराच्या बाहेर जावून अंगणात पाहिले असता तेथे कपाटातील ड्रावर व पर्स पडलेले दिसले.
सदर पर्स मध्ये सोन्याचे मंगळसूत्र एक तोळा वजनाचे व नाकातील नथ अर्धा ग्रॅम वजनाचे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे पगारे यांच्याकडे मुक्कामी आलेले नातेवाईक प्रकाश धोंडु कदम यांची हॉलमध्ये ठेवलेली रोलॅक्स कंपनीची घड्याळ दिसून आली नाही. चोरट्याने ती चोरून नेली. एकूण 2,08,500/- रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe