छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त ढोल ताशांचा गजर, लेझीमसह वाजत गाजत मिरवणूक !

औरंगाबाद दि.१९: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी ( दि.१९) शिवप्रतिमेची ढोल ताशाचा गजर, लेझीमसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. साडेतीन तास ही मिरवणूक चालली.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्यानंतर शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी मिरवणूकीस झेंडा दाखविला. मिरवणुकीत प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान, संचालक डॉ.आनंद देशमुख, अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.राम चव्हाण, डॉ.कैलास अंभुरे, डॉ.भास्कर साठे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, प्रकाश आकडे, बाळु इंगळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संयोजन समितीचे सदस्य नामदेव कचरे, योगेश उबाळे, माउली अवचार, अमोल शिंदे, दीपक टोनपे, दत्ता सोळंके, भूषण चोपडे यांच्यासह सहकारी यांनी मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर मिरवणूक नाट्यगृहात पोहोचल्यानंतर दुपारी एक वाजता कार्यक्रम सुरू झाला.

Back to top button
error: Content is protected !!