छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठाच्या नाट्यगृहात राडा: महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात विद्यार्थ्यावर माजी विद्यार्थ्याचा हल्ला !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु असलेल्या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात विद्यार्थ्यावर माजी विद्यार्थ्याने हल्ला चढवला. धारदार वस्तून मारहाण केल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. सिडको एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.

संतोष लालबहादुर गौतम (वय 35 वर्ष, धंदा शिक्षण, रा. प्लॉट नं. 79, राजेंद्रनगर नारेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यासंदर्भात संतोष लालबहादुर गौतम याने बेगमपुरा पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ड्रामा डिपार्टमेन्ट मध्ये शिक्षण घेत आहे.

दि 08/05/2023 रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास विद्यापीठातील नाट्यगृह येथे महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरु असताना संतोष लालबहादुर गौतम हा प्रेक्षक म्हणुन बसलेला होतो. गौतमसोबत त्याचे मित्रही हा कार्यक्रम पाहात होते. तेवढ्यात तेथे ड्रामा डिपार्टमेंटचा माजी विद्यार्थी पृथ्वी खेंगटे हा तेथे आला. ऑगस्ट 2022 मध्ये संतोष लालबहादुर गौतम याने त्याच्या विरुध्द सिडको एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन  शिवीगाळ करु लागला.

संतोष लालबहादुर गौतम याच्यासोबत झटापट करु लागला.  झटापट सुरु असताना पृथ्वी खेंगटे याने त्याच्या खिशातून काही तरी धारदार वस्तू काढली व संतोष लालबहादुर गौतम याच्या कमरेच्या उजव्या बाजुला मारून जखमी केले. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास तुला जिवे मारून टाकीन अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर जखमी संतोष लालबहादुर गौतम याला त्याच्या मित्रांनी घाटीत दाखल करून प्राथमिक उपचार करून घेतले.

याप्रकरणी संतोष लालबहादुर गौतम याने दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि बोडखे यांनी पृथ्वी खेंगटे याच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी पोह पवार यांच्या कडे दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!