छत्रपती संभाजीनगर
Trending

एक शाम बशर नवाज के नाम मुशायरा, देशातील प्रसिद्ध व नामवंत शायर सहभागी होणार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रतीवर्ष प्रमाणे शहरातील प्रसिद्ध शायर स्व.बशर नवाज यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक शाम बशर नवाज के नाम महेफिल ए मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मुशायरा कार्यक्रमात देशातील प्रसिद्ध व नामवंत शायर सहभागी होणार आहेत. स्व.राहत इंदोरी यांच्या सारख्या नामवंत शायर यांचा सहभाग यात लाभला आहे.

प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दि १८ जून रविवार रोजी सायंकाळी ७.३० वाजता संत एकनाथ रंग मंदिर येथे मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सहभागी शायर पुढील प्रमाणे- श्री एहसान कुरेशी, मुंबई श्री बिलाल सहारनपुरी, श्री नदिम फर्रुख (आग्रा ) श्री चरन सिंग बशर, श्री हसन काझमी (लखनौ) श्री नईम अख्तर खादमी (मध्यप्रदेश), श्री मनन फराज (जबलपुर) श्री आदर्श दुबे सगर (मध्यप्रदेश), श्री हमीद भुसावली श्री अन्वर कमाल (बहरीन), श्री खमर एजाज (औरंगाबाद) श्री फरयाज तनकी (राजस्थान), श्री खान शमिम (अध्यक्ष मुशायरा)

तसेच या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद विरोधीपक्ष नेता बादास दानवे, खासदा सय्यद इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष निमंत्रित सतीश चव्हाण विधान परिषद सदस्य, विक्रम काळे विधान परिषद सदस्य, हरिभाऊ बागडे विधान सभा सदस्य, प्रदीप जैस्वाल विधान सभा सदस्य, संजय शिरसाट, विधान सभा सदस्य , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त मनोज लोहीया, जी श्रीकांत, प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका उपस्थित राहणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!