छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिडको, भारत बाजार, कॅनॉट प्लेस, प्रोझोन मॉल परिसरातील अतिक्रमण हटवले ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा !!

एन १ व एन ८ सिडको परिसरातील अतिक्रमणे हटवली

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत शहरातील एन ८ आणि एन १ सिडको कॅनॉट परिसरात कारवाई करण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये आज, ११ मार्च रोजी एन ०८ येथील बजरंग चौक पासून पुढे एन ८ हॉस्पिटल रस्त्यावर सदर अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण १५ बोर्ड, लोखंडी काउंटर आणि डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आले. तसेच इतर सर्व रस्त्यावरील कच्चे पक्के बांधकामे जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

तसेच एन ०१ सिडको बस स्टँड पासून प्रोझोन मॉल परिसर व एन ०१ पोलीस चौकी या भागात कारवाई करून १३ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. पार्किंगच्या जागेत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण केल्याने एकूण २८ अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नुसार 478 कलम अंतर्गत 24 तासाची नोटीस देण्यात आली आहे.

भारत बाजार आणि कॅनॉट परिसरातील नागरिकांना दंडापोटी अंदाजे २५०००/- रुपये दंड आकारण्यात आला. जनहित याचिका नुसार ही कारवाई अशी सुरू राहणार आहे. ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, सिडकोचे उदय चौधरी नगर रचना विभागाचे पूजा भोगे, वंदना खिल्लारे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी मझर अली, रामेश्वर सुरासे पोलीस पथक सह सर्व मजूर यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!