महाराष्ट्र
Trending

भूमी अभिलेखचा शिरस्तेदार, भूकरमापक आणि मोजणीदार ३ लाखांच्या लाच पडताळणी सापळ्यात अडकले !

नाशिक, दि. ११ – तळेगाव येथील क्षेत्राची मोजणी आणि फायनल लेआऊट करून देण्यासाठी भूमी अभिलेखचा शिरस्तेदार, भूकरमापक आणि खाजगी मोजणीदार ३ लाखांची लाच पडताळणीच्या सापळ्यात अडकले. सुरुवातीला १० लाख त्यानंतर ६ आणि तडजोडीअंती ३ लाख रुपयांची त्यांनी मागणी केल्याचे पडताळणी सापळ्यात निप्पन्न झाल्याचे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.

दौलत नथु समशेर (शिरस्तेदार), भास्कर प्रकाश राऊत (भूकरमापक दोन्ही नेमणुक – उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, त्रंबकेश्वर, जि. नाशिक), वैजनाथ नाना पिंपळे (मोजणी व बांधकाम व्यवसाय, रा. शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे नावे असलेल्या मौजे तळेगाव येथील क्षेत्राचे शेजारील क्षेत्राची फायनल लेआऊट करीता मोजणी करताना तक्रारदार यांचे क्षेत्र सरकु न देण्याच्या मोबदल्यात शिरस्तेदार दौलत नथु समशेर, भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत (दोन्ही नेमणुक – उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, त्रंबकेश्वर, जि. नाशिक) यांनी ६,००,०००/- रुपये रक्कमेची तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

सदर तक्रारीवरुन ला. प्र. वि. नाशिक पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान शिरस्तेदार दौलत नथु समशेर, भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत यांनी १०,००,०००/- रूपये मागणी करून तडजोडअंती ६,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली व त्यानंतर दोघांच्या वतीने आरोपी क्र ३ वैजनाथ नाना पिंपळे (मोजणी व बांधकाम व्यवसाय, रा.शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक) यांनी आपल्या स्वत:चे ऑफीसमध्ये तडजोडअंती ३,००,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्याने तिघांविरुध्द त्रंबकेश्वर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!