छत्रपती संभाजीनगर
Trending

जयभोले चहा नाश्ताचे हॉटेल चालवण्यास द्या म्हणून बहीणीच्या डोक्यात पकडने मारहाण !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – जयभोले चहा नाश्ताचे हॉटेल चालवण्यास द्या म्हणून बहिणीच्या डोक्यात पकडने मारहाण करण्यात आली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी १५.४४ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहारत घडली. धीरज श्यामसुंदर दर्डा (वय २४ वर्षे, रा. संमती टाईप रायटरच्या बाजूला, चेलीपुरा, शहागंज, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यातील फिर्यादी व आरोपी हे सख्खे बहीण भाऊ असून फिर्यादी ही दिवाळी सणानिमीत्त चार दिवसांपासून आई – वडीलांकडे आलेली आहे. यातील आरोपी धीरज श्यामसुंदर दर्डा हे वडीलांना जयभोले नावाचे चहा नाश्ताचे हॉटेल चालविण्यास द्या असे म्हणू लागला व शिवीगाळ करु लागला. त्यामुळे तेथे फिर्यादीची छोटी बहीण तेथे येवून त्यास शिवीगाळ करु नको असे म्हणत असतांना त्याने आई व बहीण हिला हाताचापटाने मारहान केली व स्टीलचा ग्लास हातात धरून बहीणीच्या छातीवर जोर जोरात मारले.

तेव्हा फिर्यादी तिला सोडवण्यास गेली असता नमुद आरोपीने फिर्यादीस लोखंडी पकडने डोक्यावर व कानाजवळ मारहान केली व हिस जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवून तीला तू मतीमंद असून हीला घरातून काढून द्या, हिच्यावर होणाऱ्या खर्चाचे पैसे मला द्या असे म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून धीरज श्यामसुंदर दर्डा यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 375/2023 कलम 324, 323, 504,506 भादंविसह कलम 92 ऄपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह कोलते करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!