छत्रपती संभाजीनगर
Trending

का रे तू जास्त मस्तीत आला का असे म्हणून पोटात चाकूने वार केला ! एकतानगर जटवाडा रोड हर्सूलमधील घटना !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- का रे तू जास्त मस्तीत आला का असे म्हणून पोटात चाकूने वार केला. जुन्या भांडणातून एकतानगर जटवाडा रोड हर्सूलमध्ये ही घटना घडली. ९ नोव्हेंबर रोजी २०.०० वाजेच्या सुमारास एकतानगर जटवाडा रोड हर्सूल छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली.

रोहन अनिल बनकर (वय २३, रा. एकतानगर, जेलच्या भिंतीला लागून, हर्सूल, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. आजु नवाब पठाण (वय २१, रा. रोजाबाग, छत्रपती संभाजीनगर) व रितेश अंकुश साळवे (वय १९, रा. एकतानगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपातंनी संगणमत करून जुन्या भाडणाच्या कारणावरून फिर्यादी रोहन बनकर यास  म्हणाले की, “का रे रोहन तू जास्त मस्ती आला का थांब तुला दाखवतो ” असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ करून दोघांनी मिळून फिर्यादीला हाताचापटाने-लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपी क्र 1) आजु नवाब पठाण याने कमरेचा चाकु काढून पोटावर बेंबीच्या खाली डाव्या बाजुस मारून जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी रोहन अनिल बनकर (वय २३, रा. एकतानगर, जेलच्या भिंतीला लागून, हर्सूल, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून आजु नवाब पठाण (वय २१, रा. रोजाबाग, छत्रपती संभाजीनगर) व रितेश अंकुश साळवे (वय १९, रा. एकतानगर, छत्रपती संभाजीनगर) या दोघांवर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये 250/2023 कलम 324, 323, 504,506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि चव्हाण करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!