महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या भाग्यलक्ष्मी चौकात इंजिनियरला बेदम मारहाण ! सायंकाळच्या सुमारास गुंडागर्दी, हाड फॅक्चर होईपर्यंत मारले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- रस्त्यात थांबलेल्या व्यक्तीला थोडे बाजूला व्हा आम्हाला जावू द्या असे म्हणताच त्याने शिवीगाळ करून मारहाण सुरु केली. हाड फॅक्चर होईपर्यंत मारहाण केल्याची घटना भाग्यलक्ष्मी midc चौक जालन्यात सायंकाळच्या सुमारास घडली. अगदीच सायंकाळच्या सुमाराला ही गुंडागर्दी झाल्यामुळे जालन्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अभिषेक विनायक कानगावकर (वय 26 वर्षे, व्यवसाय प्रोजेक्ट इंजिनिअरिंग रा. सोनम नगर रेल्वेस्टेशन जालना) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर गादीया हॉस्पिटल जालना येथील जनरल वार्ड क्र. 110वर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असताना त्यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, आयकॉन कंपनीमध्ये मागील तीन वर्षांपासून ते इंजिनिअरिंग म्हणून काम करतात.

दि- 4/10/2023 रोजी कंपनीमधून मो.साने वडिल विनायक कस्तुरचंद कानगावकर व अभिषेक कानगावकर जात असताना सायंकाळी 07.00 वाजेच्या सुमारास भाग्यलक्ष्मी midc चौक जालना येथे ते पोहोचले. तेथे रहदारी असल्याने रस्त्यात उभे असलेल्या एका जणास अभिषेक कानगावकर म्हणाले की, थोडे बाजूला व्हा आम्हाला जावू द्या असे म्हणताच त्या अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व बाजूला असलेल्या लाकडी दांडा हातात घेवून पाठीत व गुडघ्यावर पोट-यावर मारू लागला.

ज्यात अभिषेक कानगावकर यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली मार लागला. तसेच ईतर दोन अनोळखी व्यक्तींनी वडील विनायक कानगावकर यांना दांड्याने मारहाण केली. ज्यात वडीलाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली व पाठीवर व बोटाला मार लागल्याने ते जखमी झाले. सदर अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

मोटारसाकलचेही त्यांनी नुकसान केले. त्यानंतर जखमी अभिषेक कानगावकर यांना गादीया हॉस्पिटल येथे औषधीउपचारकामी दाखल केले. सध्या माझ्यावर औषधीउपचार चालू असून उजव्या पायाचे हाड मोडल्याने (फॅक्चर) झाले आहे. याप्रकरणी जखमीने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस स्टेसनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या अनोळखी मारेकर्यांचा शोध घेत आहे.

Back to top button
error: Content is protected !!