छत्रपती संभाजीनगर
Trending

बंदुकीच्या गोळ्या झाडून एकेकाची हत्या करण्याची धमकी ! बाधीत क्षेत्राचा मोबादला मिळवून देण्याचे आमिष !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- बाधीत क्षेत्राचा मोबादला मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे वडीलोपार्जित मिळकत नावावर करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या झाडून एकेकाची हत्या करण्याची धमकी दिल्याची तक्रार महिलेने दाखल केली आहे.

फेरोज अहमद खान (रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी यांच्या मालकीची वडीलोपार्जित मिळकत फेरोज अहमद खान याने खोटे बनावट कागदपत्राच्या आधारे वडीलोपार्जित मिळकत भूखंड क्र. 11312/1 ही कोट्यावधी रुपयांची मिळकत गुन्हेगारी कट रचून फिर्यादीला बाधीत क्षेत्राचा मोबादला मिळवून देण्याचे आमीष दाखवले.

आमिष दाखवून स्वतःच्या नांवावर करून घेतली आहे. बंदुकीच्या गोळ्या झाडून एकेकाची हत्या करून टाकीन मी तडीपार भोगून आलेला कुख्यात हिस्ट्रीशिटर गुंड आहे. माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही. अशी धमकी दिली. नगर भूमापन कार्यालयामध्ये खोट्या व बनावटी कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीच्या नांवावरील भूखंड क्रमांक क्र. 11312/1 नावावर केल्याचे फिर्यादीने प्रथम माहिती अहवालात नमूद केले आहे.

याप्रकरणी महिला फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून फेरोज अहमद खान (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गांगुर्डे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!