महाराष्ट्र
Trending

जालना: पंगतीत वाढ करताना बिर्याणीचा भात हातावर पडल्याने चाकु हल्ला, तिघे जखमी !

संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – पंगतीत वाढ करताना बिर्याणीचा भात हातावर पडल्याने वादाला तोंड फुटले. भांडणही झाले. लोकांच्या मध्यस्थिने ते तूर्त मिटलेही. मात्र, त्यानंतर पुन्हा भांडण झाले. भांडणात लाठ्या-काठ्यासह चाकू हल्ला चढवण्यात आला. यात तिघे जखमी झाले. ही घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात घडली.

1 ) शेख मन्नान शेख फरिद 2)शेख इरफान शेख मन्नान 3 ) ) रेशमा अय्युब पठाण 4 ) अन्य एक महिला अशी आरोपींची नावे आहेत.

शेख शकिल शेख शफिक (वय 27 वर्षे, रा. सरताज कॉलनी, मंठा, जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की,  बहिनीच्या घरी (रा. केंधळी) दि. 27/04/2023 रोजी लग्णाचा व 28/04/2023 रोजी रिसेप्शनचा कार्यक्रम होता म्हणून कुटुंबातील सर्व लोक कार्यक्रमासाठी गेले होते. रिसेप्शनच्या दिवसी पंगतीमध्ये वाढ करताना जालना येथील व-हाडा सोबत आलेला शेख मन्नान शेख फरिद याच्या हातावर शेख शकिल शेख शफिक यांच्याकडून बिर्यानीचा भात पडल्याने त्याने शेख शकिल शेख शफिक याच्यासोबत भांडन केले. त्यास लोकांनी समजावून सांगितले व भांडण मिटले.

दि. 29/04/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शेख शकिल शेख शफिक हा नातेवाईकांसह बहिनीच्या केंधळी येथील घरी अंगणात बसला होता. तेवढ्यात 1 ) शेख मन्नान शेख फरिद 2)शेख इरफान शेख मन्नान 3 ) ) रेशमा अय्युब पठाण 4 ) अन्य एक महिला (सर्व रा. साईनाथनगर मंठा चौफुली जालना) हे फोर्ड कंपनीची पांढ-या रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये बसून आले.

त्यांच्या हातात काठ्या, चाकू होता. मन्नान शेख शकिल शेख शफिक याला म्हणाला की काल तू माझ्या हातावर बिर्याणीचा भात हा मुद्दाम टाकलास व शहानपणा पण करु लागलास. मी तुला कोण आहे आज दाखवितो असे म्हणून शिविगाळ करु लागले. सर्वच्या सर्वच शेख शकिल शेख शफिक याच्या अंगावर धावून आले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले.

तेवढ्यात शेख ईरफान शेख मन्नान याने त्याच्या कमरेतील चाकू हातात काढून शेख शकिल शेख शफिक याच्या पोटावर वार केला. यात शेख शकिल शेख शफिक याच्या पोटाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. या भांडणात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान नातेवाईकांनी हे भांडण सोडवले. त्यानंतर जखमींना सरकारी दवाखाना मंठा येथे आणले. मंठा येथील डॉक्टरांनी उपचार केला.

सय्यद रशिद व शेख रईस यांना चाकुचा गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखाना जालना येथे पाठवले. शेख शकिल शेख शफिक याने दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!