महाराष्ट्र
Trending

महावितरणचा सहायक अभियंता ४० हजारांची लाच घेताना पकडला ! मीटरवर वाढीव लोड मंजुर करून देण्यासाठी भरला खिसा !!

नाशिक – मीटरवर वाढीव लोड मंजुर करून देण्यासाठी म.रा.वि.वि कंपनीच्या सहायक अभियंत्यास ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. नाशिकच्या म.रा.वि.वि कंपनी घोटी येथील कार्यालयात लाच घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सचिन माणिकराव चव्हाण (सहायक अभियंता, म.रा.वि.वि कंपनी, घोटी व वैतरणा विभाग जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या वॉटर प्युरिफिकेशन प्लांट येथे सद्यस्थितीत असणा-या इलेक्ट्रीसिटी मीटरवर वाढीव लोड मंजुर करून देण्यासाठी सहायक अभियंता सचिन माणिकराव चव्हाण (म.रा.वि.वि कंपनी, घोटी व वैतरणा विभाग जि. नाशिक) यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी ४०,०००/- रू. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

या तक्रारीवरून ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान सहायक अभियंता सचिन माणिकराव चव्हाण (म.रा.वि.वि कंपनी, घोटी व वैतरणा विभाग जि. नाशिक) यांनी तक्रारदार यांचेकडून ४०,००० /- रू. लाचेची मागणी केली.

सदर लाचेची रक्कम दि. २६.४.२०२३ रोजी म.रा.वि.वि कंपनी घोटी येथील कार्यालयात स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!