खुलताबाद
Trending

म्हैसमाळमधील हॉटेल रवि ढाब्यावर पोलिसांची छापेमारी ! कुंटनखान्याचा पर्दाफाश, दोन पीडित महिलांची सुटका !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – पर्यटनस्थळी चालु असलेल्या कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. सायंकाळच्या सुमारास रवि ढाबा लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग येथे पीटा कायद्यान्वये रेड टाकण्यात आली. घटनास्थळावरून ६३,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेश्या व्यवसाय चालवणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २१/०६/२०२३ रोजी सायंकाळी १७:३० वाजेच्या सुमारास खुलताबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील म्हैसमाळ येथील हॉटेल रवि ढाबा लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग याठिकाणी चालु असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकला. दोन पीडितांची सुटका करून आरोपीतांविरुध्द अनैतिक देह व्यापार अधिनियम प्रमाणे खुलताबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या सपोनि आरती जाधव आणि विषेश पथकाचे सपोनि सुदाम शिरसाठ, तसेच पोलीस हवालदार अनिल धुरंधरे, भागीनाथ आहेर, गोपाल पाटील, पोलीस अमंलदार श्रीकांत दांडगे, महिला पोलीस अंमलदार सीता ढाकणे, या पथकाने म्हैसमाळ खुलताबाद रोडवरील कारभारी देवका जाधव यांच्या मालकीचा रवि ढाबा लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग येथे पीटा कायद्यान्वये रेड टाकण्यात आली.

वेश्या व्यवसाय चालवणारा कारभारी देवका जाधव (रा. म्हैसमाळ ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्या ताब्यातून ६३,७७० रुपयांचा मुद्देमाल (ज्यात मोबाईल, निरोध पाकीटे, व रोख रक्कम) मिळाल्याने त्याच्या विरुध्द पोलिस स्टेशन खुलताबाद येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणहून दोन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!