छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महापालिकेच्या लिपीकांना धड टायपिंगही येईना ! आयुक्तांनी सरप्राईज इन्स्पेक्शन करून घेतलेल्या टेस्टमध्ये दोन कारकून नापास !!

जी श्रीकांत यांनी मनपाच्या विविध विभागांची केली अचानक पाहणी

संभाजीनगर लाईव्ह, दि 23- महानगरपालिकेतील काही लिपिकांना धड टायपिंगही येत नसल्याचे आज खुद्द आयुक्त जी श्रीकांत यांनी केलेल्या अचानक पाहणी दौऱ्यातून समोर आले आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थित तीन लिपिकांची टेस्ट आयुक्तांनी आज घेतली. यात दोन लिपिक नापास झाले.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज दिनांक 23 जून रोजी सकाळी 11.30 वाजता महानगरपालिका मुख्यालयाचा अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. पाहणी दौऱ्या दरम्यान विभागातील मनपा आस्थापना वरील लिपिकांचे त्यांनी टायपिंग टेस्ट घेतली.

शिक्षण विभागाचा आढावा घेताना त्यांनी विभागातील उपस्थित तीन लिपिकांची टायपिंग टेस्ट घेतली. याच्यात दोन लिपिक अपयशी ठरले असून त्यांचे नाव नोंद करून घेण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले. यावेळी उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे व इतर संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, आयुक्त जी श्रीकांत यांनी जीबी हॉलचा प्रगतीपथावर असलेले कामाची पाहणी देखील केली आणि संबंधित गुत्तेदाराला सदरील काम सप्टेंबर अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यादरम्यान त्यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्ष, विधी सल्लागार, कामगार विभाग,एन यु एल एम आणि शिक्षण विभागाची पाहणी केली आणि या विभागातील उपस्थित कोणता कर्मचारी कर्मचारी काय काम करतो याबाबत विचारणा केली.

Back to top button
error: Content is protected !!