छत्रपती संभाजीनगर
Trending

गव्हाच्या अतिरिक्त साठेबाजीवर कारवाईचे आदेश ! घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिर्टलर्स व प्रोसेसर्स प्रशासनाच्या रडारवर !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.23 -: केंद्र शासनाच्या दि. 12 जून 2023 च्या अधिसुचनेनुसार घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिर्टलर्स व प्रोसेसर्स करीता गव्हाच्या साठ्यावर दि. 31 मार्च 2024 पर्यंत निर्बंध लागू केलेले आहे. यात घाऊक व्यापारी 3 हजार टन, किरकोळ व्यापारी प्रत्येक आउटलेटसाठी 10 टन, बिन चेन रिटेलर्स प्रत्येक आउटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3 हजार टन व प्रोसेसर्स वार्षिक स्थापित क्षमतेच्या 75 टक्के किंवा मासिक स्थापित क्षमता गुणिले सन 2023-24 चे उर्वरित महिने यापैकी जे कमी असेल असा साठा करु शकतात.

सदरील व्यापारी यांच्याकडे असणारा गव्हाचा साठा दि. 12 जून 2023 च्या अधिसुचनेतील साठा निर्बधापेक्षा जास्त असल्यास, तसेच http://evegoils.nic.in/wsp.log.in या संकेतस्थळावर सदर अधिसूचनेच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. तसेच केंद शासनाच्या पोर्टलवर गव्हाचा साठा नियमितप्रमाणे प्रकट करण्याबाबत शासनाने आदेशीत, निर्देशीत केले आहे.

त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापरी, किरकोळ व्यापारी, बिग चेन रिटेलर्स व प्रोसेसर्स यांनी http://evegoils.nic.in/wsp.log.in या संकेतस्थळावर विहीत मुदतीत प्रकट करण्यात यावा. त्यानंतर संकेत स्थळावर दर शुक्रवारी साठा बाबतची माहिती नोंद करणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व संबधित आस्थापनाना कळविण्यात येते की, त्याच्या कडील गव्हाचा साठा (दर शुक्रवारी) उपभोक्ता मामले विभागाच्या http://evegoils.nic.in/wsp.log.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अपलोड करावा.

शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधपेक्षा गव्हाचा साठा जास्त आढळून आल्यास व साठेबाजी करणाऱ्या संबंधीत आस्थापना व्यापाऱ्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक करावाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी यांचया आदेशान्वये कळवण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!