महाराष्ट्र
Trending

तहसीलदार एजंटाच्या माध्यमातून लाच घेताना सापळ्यात अडकले ! वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी एजंटाने घेतले २० हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी तहसीलदार एजंटाच्या माध्यमातून २० हजारांची लाच घेताना सापळ्यात अडकले. एजंटाला २० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या तहसीलदारांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय जबाजी बोरुडे वय ४४ वर्ष, तहसिलदार कोपरगांव, वर्ग-१, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर, रा. शासकीय निवासस्थान कोपरगांव, जि. अहमदनगर) व गुरुमीत हरजितसिंग डडियाल (वय ४० वर्षे, खाजगी एजंट, रा. स्वामीरंग अपार्टमेंट, यश कोचिंग क्लासेसजळ, कोपरगांव, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरीता यातील खाजगी एजंट गुरुमीत हरजितसिंग डडियाल याने तहसीलदार विजय जबाजी बोरुडे यांच्या करीता २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्वीकारण्याचेही मान्य केले.

तहसीलदार विजय जबाजी बोरुडे यांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम खासगी एजंट गुरुमीत हरजितसिंग डडियाल यांनी स्वीकारताना त्यांना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कोपरगांव शहर पोलिस स्टेशन गुरनं. २४२ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ), १२ प्रमाणे दि.२०/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!