महाराष्ट्र
Trending

महानिर्मितीचा पेपर फुटला, FIR दाखल करून सरकारने SIT स्थापन करावी: स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या दाव्याने महानिर्मितीला ४४०चा झटका

मुबंई, दि. ९ – महानिर्मितीचा पेपर फुटला असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे महानिर्मितीने रीतसर FIR दाखल करून सरकारने SIT स्थापन करावी, असी मागणीही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने फुटलेल्या पेपरचा काही भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे. पेपर फुटल्याचे पुरावे असल्याचा दावा करत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे की, हा पेपर ज्युनिअर सीक्युरिटी ऑफिसर पदाच्या सेकंड स्टेज मधील साइकोमेट्री टेस्टचा आहे. हा पेपर ऑफलाईन होता आणि विभागाकडून सबमिट करून घेण्यात आला होता, म्हणजे पेपरचा फोटो बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. पण अत्याधुनिक हाय-टेक कॅमेरा वापरून सदर पेपर फोडून परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात आला आहे.

पेपरचा एकच भाग क्रॉप करून जाहीर करत आहोत कारण पूर्ण फोटो जाहीर केल्यास, तो पूर्ण फोटो नक्की कोणता आहे आणि कुणी पाठविला, हे घोटाळेबाजांना समजेल आणि ज्या व्यक्तीने आम्हाला हा फोटो पाठविला आहे त्याच्या जीवितास धोका निर्माण होईल.

महानिर्मितीचे नक्की किती पेपर फुटले आहेत, किती घोटाळेबाज याप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत? या घोटाळ्यामध्ये नक्की कोण-कोण सामील आहेत. या सर्वांसाठी महानिर्मितीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची मा. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली #SIT चौकशी करण्यात यावी. स्टेज-१ मधील पण पेपर फुटल्याची शक्यता आहे त्यामुळे महानिर्मितीने याप्रकरणाची रीतसर FIR दाखल करावी आणि सरकारने SIT स्थापन करण्याची तत्काळ घोषणा करावी, असी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!