छत्रपती संभाजीनगर
Trending

ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेतील खेर्डा व उर्वरीत आठ गावांसाठी फेर भूसंपादन प्रक्रिया राबवण्याचे निर्देश !

ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना भूसंपादनाबाबत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला आढावा

संभाजीनगर लाईव्ह, दि.9 – राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कालव्यांसाठी करावयाच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतला. खेर्डा व उर्वरीत आठ गावांसाठी फेर भुसंपादन प्रक्रिया राबवावी व त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी निश्चित केला. त्यानुसार ही प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना खेतमाळीस तसेच गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष श्रीमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता वानखेडे, उपअधीक्षक भुमि अभिलेख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित कालव्यासाठी भुसंपादन करावयाची जमीन, त्यासाठी राबवावयाची प्रक्रिया, शेतकऱ्यांना देण्यात आलेला व द्यावयाचा मोबदला या सर्व टप्प्यांचा भुमरे यांनी आढावा घेतला. यातील खेर्डा व उर्वरीत आठ गावांसाठी फेर भुसंपादन प्रक्रिया राबवावी व त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी निश्चित केला. त्यानुसार ही प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!