छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

सिडकोतील वृद्ध महिलेचा खून ! मृतदेह गोणीत कोंबून चौका ते लाडसावंगी रोडवरील विहिरीत फेकला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोतील वृद्ध महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत कोंबून छत्रपती संभाजीनगर शहराबाहेरील चौका ते लाडसावंगी रोडवरील विहिरीत फेकून दिला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काडून पोस्टमार्टेम केले असता प्राप्त पोस्ट मार्टम सर्टीफिकेटमध्ये मृत्यूचे कारण due to asphyxia due to throttling गुदमरुन गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शशीकलाबाई दिनकरराव कुपटकर (वय 75, व्यवसाय गृहणी रा प्लॉट नं 21 न्यू एस टी कॉलनी एन 2 सिडको छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस निरीक्षक संदीप सीताराम राजपूत (फुलंब्री पोलिस स्टेशन) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 13/10/2023 रोजी पोलीस स्टेशन फुलंब्री येथे हजर असतांना चौका येथील सरपंच साळवे यांनी फोनद्वारे माहिती दिली की, चौका ते लाडसावंगी रोडच्या बाजुला शेतातील विहिरीमध्ये गोणीत बांधून काहीतरी संशयास्पद फेकले आहे.

ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप राजपूत सोबत पोहकों राठोड हे तातडीने रवाना झाले. मौजे चौका शिवारात ते पोहोचले. तेथे अयुब इस्माईल पठाण (रा. चौकावाडी) यांच्या शेतात गट नं 112 चौका शिवारातील विहीरीतील पाण्यात एक गोणी तरंगत असल्याचे दिसले. पंचनाम्या दरम्यान घटनास्थळावरील विहिरीतील गोणी पंचासमक्ष शेत मालक व इतर लोकांच्या मदतीने बाहेर काढली. गोणीची पाहणी केली असता गोणीला एका बाजुने सुतळीने शिवलेले दिसून आले. त्यानंतर सदर सुतळी तोडून पाहिले असता एक अंदाजे 60 ते 65 वयोगटातील महिलाचा मृतदेह मिळून आला.

धारदार वस्तूने वार केल्याच्या गंभीर जखमा दिसल्या. सदर मृतदेह तीन गोण्यामध्ये टाकलेला होता. त्या तिन्ही गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सदर मृतदेहची ओळख पटणेकरिता महिलेचा फोटा व संदेश तयार करुन वॉटसअप ग्रुपवर पाठवला. थोडया वेळाने समजले की, छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातील पोलिस स्टेशन मुंकदवाडी येथे सदर महिला बेपता झाल्यामुळे मिसींग तक्रार दिनांक 13/10/2023 रोजी दाखल करण्यात आलेली होती.

सदर महिलेचे नाव शशीकलाबाई दिनकरराव कुपटकर (वय 75 व्यवसाय गृहणी रा प्लॉट नं 21 न्यू एस टी कॉलनी एन 2 सिडको छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी सदर महिलेचे नातेवाईक यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी येवून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह पुढील कारवाई करीता ग्रामीण रुग्णालय फुलंब्री येथे आणला.

दिनांक 15/10/2023 रोजी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय फुलंब्री यांनी सदर प्रकरणात प्रोव्हीजनल पोस्ट मार्टम सर्टीफिकेट दिले असून त्यात मृत्यूचे कारण due to asphyxia due to throttling गुदमरुम गळा दाबून झाल्याचे नमुद केले आहे. तसेच चौकशीमध्ये मृताचे नातेवाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12/10/2023 रोजी त्यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संध्याकाळी 06.30 वाजेच्या सुमारास त्यांना निघतांना बघितले आहे. त्यानंतर त्यांना ठार मारून गोण्यात टाकून चौका शिवारातील विहिरीत फेकले असल्याचे जवाबात म्हटले आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकर्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!