छत्रपती संभाजीनगर
Trending

सावंगी केंब्रीज बायपासवर कोलठाणवाडी चौकाजवळील पुलाखाली नदीत स्कॉर्पिओ कोसळून हर्सूलच्या शेतकऱ्याचा मृत्यू !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६- सावंगी केंब्रीज बायपासवरील कोलठाणवाडी चौकाजवळील पुलाखाली नदीत स्कॉर्पिओ कोसळून हर्सूलच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वळणावर अंदाज न आल्याने हा अपघात झाला. सारंगधर मुरलीधर औताडे ( पत्ता, कोलठाणवाडी रोड हर्सूल छत्रपती संभाजीनगर) असे अपघातातील मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मृताचे भाऊ योगेश मुरलीधर औताडे (वय 32 वर्ष, व्यवसाय शेती, पत्ता, कोलठाणवाडी रोड हर्सूल छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 28/09/2023 रोजी पहाटे 03.00 ते 04.00 वाजता भाऊ सारंगधर मुरलीधर औताडे हा त्याच्या जवळील स्कारपीओने घरातून शेतात कामानिम्मीत जात होता. सावंगी केब्रीज बायपास कोलठाणवाडी चौक येथे असताना सारंगधर औताडे यांचा अपघात झाला.

अपघात स्थळाजवळी एका हॉटेलच्या मालकाने ही माहिती योगेश औताडे यांना दिली की सारंगधर औताडे यांचा सावंगी केब्रीज बायपास कोलठाणवाडी चौक येथे वळणावर अपघात झाला. ही माहिती मिळताच योगेश औताडे व नातेवाईक लगेच अपघात स्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी अपघातात जखमी झालेल्या सारंगधर औताडे यांना एम्स हॉस्पिट येथे दाखल केले. एम्स हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केला. त्यानंतर सारंगधर औताडे यांना पुढील उपचारासाठी मेडीकोअर दवाखान्यात दाखल केले.

तेथे त्याच्यावर उपचार चालू असतांना दिनांक 01/10/2023 रोजी रात्री 09.30 वाजता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या पोटाला गंभीर मार व किडनी पूर्णपणे निकामी झाल्याने सारंगधर औताडे यांना मृत घोषित केले. नंतर मृत सारंगधर मुरलीधर औताडे यांना घाटीत पोस्टमार्टेमसाठी दाखल केले. तेथे पीएम झाल्यानंतर हर्सूल येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

Back to top button
error: Content is protected !!